ना. एकनाथ शिंदे यांचेकडील विशेष निधीतून मंजूर झालेल्या पाटण मतदारसंघातील मंजूर कामांना निधी वर्ग. ना. शंभूराज देसाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दौलतनगर दि.22 : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे यांचेकडे पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण विभागातील पायाभूत सुविधांच्या कामांसाठी आवश्यक असणारा निधी विशेष बाब म्हणून मंजुर करणेबाबत मागणी केली होती त्यानुसार त्यांनी रस्ते विकास महामंडळातंर्गत १६ ग्रामीण रस्त्यांच्या पायाभूत सुविधांच्या कामांना ०२ निधी मंजुर केला होता. ना.एकनाथ शिंदे यांचेकडे पाठपुरावा केल्यानंतर रस्ते विकास महामंडळांतगत मंजूर झालेल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील कामांकरीता निधी वर्ग झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे गृहग्रामीण राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

पत्रकात नामदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे,पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील जनतेच्या महत्वाच्या मुलभूत गरजा असणाऱ्या गावांना जोडणारे व अंतर्गत रस्त्यांच्या कामांना सार्वजनीक बांधकाम विभागाकडील रस्ते विकास महामंडळातंर्गत उपलब्ध निधीतून आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देणेबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे यांचेकडे पत्राव्दारे विनंती केलेली होती. माझे विनंतीवरुन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाकडील रस्ते विकास महामंडळातंर्गत चोपडी ता.पाटण अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण १० लाख, नवीवाडी जिंती येथे कारळे फाटा ते नवीवाडी जिंती पोहोच रस्ता खडीकरण १० लाख, सळवे ते मान्याचीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण १० लाख, सांगवड अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण १५ लाख, पापर्डे येथील अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण  १० लाख, तारळे येथील नवलाई मंदिर ते भैरोबा देव रस्ता खडीकरण डांबरीकरण १० लाख, जाधववाडी चाफळ पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण १० लाख, आवर्डे काटेवाडी ते आवर्डे रस्ता खडीकरण डांबरीकरण  २० लाख लोरेवाडी मुरुड रस्ता खडीकरण डांबरीकरण १० लाख, कदमवाडी मेंढेघर पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण  १० लाख, वायचळवाडी कुंभारगाव अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण १० लाख, वन ते पळासरी गाव पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण १५ लाख, मरड भिकाडी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण १० लाख, फुरसाई ते मराठवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण  १० लाख, मरडफाटा ते मिसाळवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण  २५ लाख व वसंतगड ता.कराड येथे जोमलिंग फाटा जोड रस्ता खडीकरण डांबरीकरण १५ लाख असे एकूण ०२ कोटी रुपये मंजुर केले असून निधी मंजुर केल्याचे लेखी पत्र रस्ते विकास महामंडळातंर्गत देण्यात आले होते. दरम्यान रस्ते विकास महामंडळांतर्गत मंजूर कामांना निधी उपलब्ध होणेकरीता नामदार एकनाथ शिंदे यांचेकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार रस्ते विकास महामंडळांतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील मंजूर कामांना निधी वर्ग केला असल्याचे सातारा जिल्हा परिषदेला पत्राव्दारे कळविले असल्याने ना. एकनाथ शिंदे यांनी रस्ते विकास महामंडळांतर्गत मंजूर केलेली कामे तातडीने मार्गी लागणार आहेत. तसेच रस्ते विकास महामंडळांतर्गत मंजूर झालेल्या विकास कामांच्या निविदा प्रक्रिया करण्यात येऊन पावसाळा संपल्यानंतर मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात करावी,अशा सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून रस्ते विकास महामंडळांतर्गत पाटण विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामांना 02 कोटी रुपयांचा निधी मंजुर केलेबद्दल मी नामदार एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानत असल्याचेही नामदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!