दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑक्टोबर २०२१ | फलटण | फलटण शहरासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या भुयारी गटार योजनेचे मध्ये दर्जा नाही व निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याबाबतची तक्रार नगरसेवक अशोकराव जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केलेली होती. त्यासोबतच उच्च न्यायालय मध्ये नगरसेवक अशोकराव जाधव यांनी पीआयएल म्हणजेच जनहित याचिका दाखल केलेली होती. उच्च न्यायालयामध्ये भुयारी गटार योजनेची व फलटण शहरांमधील रस्त्यांच्या सद्यस्थितीचा अहवाल दाखल केल्यानुसार नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, म्हणून सदरील अर्ज उच्च न्यायालयात निकाली काढण्यात आलेला आहे. सबब कारणावरून स्थगिती देण्याबाबतचा नगरसेवक अशोकराव जाधव यांचा अर्ज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निकाली काढलेला आहे.