नितीन गडकरी नागपुरात वापरणार इलेक्ट्रिक कार; नागपूर स्वच्छ, सुंदर आणि प्रदुषणमुक्त ठेवण्यासाठी घेतला निर्णय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नागपूर, दि.८: कबुल केल्याप्रमाणे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यापुढे नागपुरात फिरताना इलेक्ट्रिक कारचा उपयोग करणार आहेत. याची सुरूवात त्यांनी रविवार ७ रोजी केली. गडकरींकडे नवीन इलेक्ट्रिक कार आली. नागपूर स्वच्छ, सुंदर आणि प्रदुषणमुक्त ठेवण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे गडकरींनी सांगितले.

भविष्यात इथेनॉल, बायोडिझेल, इलेक्ट्रिक, बायोफ्यूएल, हायड्रोफ्युएल हे या देशाचे इंधन व्हावे, असे आपले प्रयत्न राहिल. त्याचाच एक भाग म्हणून बुलेटप्रुफ गाडी सोडून नागपुरात इलेक्ट्रिक गाडी वापरणार आहे. नागपुरातील सर्व सरकारी गाड्या हळूहळू सीएनजीवर कनव्हर्ट करायच्या आहेत. इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकी याव्या यासाठी प्रयत्नशील आहोत, असे गडकरी म्हणाले. लिथियम आयर्न बॅटरी असलेली ही इलेक्ट्रिक कार महागडी आहे. त्यामुळे याला पर्याय म्हणून अॅल्यूमिनियम वा स्टिल आयर्न वापरता येईल का याविषयी विचार सुरू आहे. या इंधनामुळे ८ लाख कोटींची आयात संपेल. हळूहळू नागपुरात सीएनजींचे पंप सुरू करून प्रदुषणमुक्त करू, असे गडकरी म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!