नितीन देसाई यांची एक्झिट चटका लावणारी – राज्यपाल रमेश बैस


दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२३ । मुंबई । राज्यपाल रमेश बैस यांनी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

नितीन देसाई महाराष्ट्र आणि देशातील उत्तुंग प्रतिभा लाभलेले कला दिग्दर्शक होते. त्यांची विचारशक्ती आणि कल्पनेला मूर्त रुप देण्याची क्षमता अफाट होती. अनेक चित्रपट, महानाट्य व कॉर्पोरेट इव्हेंट्सच्या वेळी त्यांनी साकारलेले भव्य – दिव्य नेपथ्य व कला सजावट थक्क करणारी होती. मोठे स्वप्न पाहण्याचा व ते साकार करण्यासाठी झटण्याचा संदेश त्यांनी युवा पिढीला दिला. नितीन देसाई यांची एक्झिट सर्वांनाच चटका लावणारी आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!