सौ. निता सस्ते ‘लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्काराने’ सन्मानित


स्थैर्य, फलटण, दि. ०६ ऑगस्ट : सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सौ. निता नरेश सस्ते यांना कोल्हापूर येथे ‘लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे अध्यक्ष डॉ. एम. बी. शेख यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोल्हापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात हा सन्मान सोहळा पार पडला. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार अत्यंत मानाचा समजला जातो. सौ. निता सस्ते यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

या यशाबद्दल सौ. निता सस्ते यांचे फलटण तालुक्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!