निशिकांत कामत यांचे निधन, काविळशी झुंज ठरली अपयशी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, हैदराबाद, दि. १७ : प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं प्रदीर्घ आजाराने हैदराबादमधील इस्पितळात निधन झालं. ते ५० वर्षांचे होते. जुलै महिन्यात कावीळ आणि पोट दुखीच्या त्रासामुळे हैदराबाद येथील गचीबोवली स्थित एआयजी इस्पितळात भरती करण्यात आलं. यावेळी त्यांना क्रॉनिक लिव्हर डिजीज आणि अन्य आजारांचं संक्रमण झाल्याचं कळलं होतं. यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

इस्पितळात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हॅपेटोलॉजिस्ट आणि वरिष्ठ सल्लागारांची टीम त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तैनात करण्यात आली होती. त्यांची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचं इस्पितळाच्या प्रशासनाकडून आधी सांगण्यात आलं होतं. पण निशिकांत यांना झालेल्या आजारवर कोणतेही उपचार नसल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात होती.

निशिकांत कामत हे बॉलिवूडमधल्या नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी एक नाव आहे. यात अजय देवगणचा ‘दृश्यम’, इफान खानचा ‘मदारी’, जॉन अब्राहमचा ‘फोर्स’ आणि ‘रॉकी हँडसम’ या सिनेमांचा समावेश आहे. बॉलिवूडआधी त्यांनी अनेक मराठी सिनेमांचंही दिग्दर्शन केलं होतं. डोंबिवली फास्ट या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं. याशिवाय त्यांनी अभिनयातही आपलं नशिब आजमावलं होतं. भावेश जोशी सिनेमात त्यांनी काम केलं होतं. त्यासोबतच रॉकी हँडसम सिनेमात त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती.


महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत.

आज एकदम शांत झालास, असं म्हणत अमेय खोपकर यांनी अश्रुंना वाट मोकळी केली आहे. सोबतच तुझी सतत आठवण येत राहिलं असंही त्यांनी म्हटलं आहे.

“अजून ‘लय भारी’ काम करायचं होतं मित्रा…तुझ्या इतका शांतचित्त दिग्दर्शक मी तरी अजून पाहिलेला नाही. आता तर अगदीच शांत झालास…अजून काय लिहू? तू तर मनातलं ओळखायचास आणि गूढ हसायचास…तसाच गूढपणे गूढ देशी निघून गेलास. तुझी आठवण सतत येत राहणार दोस्ता.”, अशी पोस्ट अमेय खोपकर यांनी केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!