
दैनिक स्थैर्य । दि. २४ डिसेंबर २०२१ । सातारा । जिद्द आणि अंगी मेहनत असेल तर या जगात काहीच अशक्य नसतं. निशाकाच्या या यशाचा आम्हा ढवळ वासीयांना सार्थ अभिमान आहे आणि म्हणूनच तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आणि आई वडिलांचे अनेकरूपी आशीर्वाद घेण्यासाठी ढवळ ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य श्री.विजयकुमार लोखंडे यांनी आज घोरपडे कुटुंबाची सदिच्छा भेट घेतली. निशाकाने या पुढेही अशीच मेहनत घेऊन राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन आपल्या आई वडिलांचे, गावचे, तालुक्याचे तसेच आपल्या जिल्ह्यचे नाव मोठे करावे अशी इच्छा श्री.लोखंडे यांनी व्यक्त केली. तसेच निशाकाला मार्गदर्शन करणारे सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे श्री.अभय लोखंडे सर यांच्याही कार्याचे कौतुक केले. कुस्तीच्या माध्यमातून आपले गाव अग्रेसर आहेच पण आता विविध क्रिडा प्रकारात ही अनेक तरुण मुला-मुलींनी यशस्वी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.