दैनिक स्थैर्य । दि. ०२ जुलै २०२२ । बारामती । बारामती विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने निर्मल वारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील 50 मुले व 166 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. मुलांकडे रात्री साडेआठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत उघड्यावर शौच न करू देण्याबाबत जनजागृती व सफाई अभियान राबवण्याची जबाबदारी दिली गेली होती. तसेच पहाटे सहा वाजल्यापासून हे जवळपास ११ वाजेपर्यंत 166 विद्यार्थिनींनी संपूर्ण बारामती शहरातील परिसर स्वच्छ करून देण्यासाठी हातभार लावला. बारामती नगर परिषदेसमोर, शारदा प्रांगण, मेन रोड, कचेरी रोड, खंडोबा नगर, टीसी कॉलेज रोड, आमराई रोड, बस स्टॅन्ड, भाजी मंडई, मुख्य बाजारपेठेतील रोड, आंबेडकर पुतळ्याजवळ, अशा अनेक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. या कामी बारामती नगरपरिषद बारामती यांचे मोलाचे सहकार्य लाभले याप्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगेश कोळपकर डॉ. राहुल तोडमल प्रा. मंगल माळशिकारे प्रा. मेघना देशपांडे प्रा. गजानन जोशी डॉ. जगदीश सांगवीकर प्रा. सविता निकाळे डॉ. कल्पना चंद्रमोरे प्रा. निलीमादेवी प्रा. कुदळे डॉ पाटील डॉ चिमणपुरे डॉ वेदपाठक डॉ गांगुर्डे व इतर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसमवेत विविध ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी प्रोत्साहित केले अशी माहिती प्राचार्य डॉ भरत शिंदे यांनी दिली व राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांची प्रशंसा केली.