निरगुडीकरांनी जपलं सामाजिक भान

नवजात बाळाच्या पालकांना रोप भेट; ग्रामपंचायतीचा पुढाकार


दैनिक स्थैर्य । 12 जुलै 2025 । फलटण । निरगुडी (ता.फलटण) येथील कुटुंबात मुलगी वा मुलगा जन्माला आला, तर त्यांच्या जन्माचे स्वागत म्हणून त्यांच्या नावाने शेतात, शेतबांधावर वृक्षांची लागवड करण्याचा संस्कार ग्रामपंचायतीने घालून दिला आहे.

निरगुडी गावामध्ये सलग चार वर्षे या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. वर्षभरात जन्माला येणार्‍या नवीन नवजात मुला-मुलींचे स्वागत येथील वन अधिकारी विलास रघुनाथ शिंदे यांच्या वतीने वृक्ष वाटप (नारळाची दोन झाडे) देऊन करून करण्यात येते. मागील वर्षी 2023-24 ला 35 बाळांच्या स्वागताचा कार्यक्रम वृक्ष वाटप करून करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सन 2024-25 ला 24 बाळांचे स्वागत करण्यात आले.

आत्तापर्यंत 400 रोपांचे वाटप करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी वन अधिकारी विलास शिंदे, सचिन सस्ते, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी नारायण कदम, आशा वर्कर्स, सत्कारमूर्ती बाळांचे आई-वडील, आजी-आजोबा, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

66 कुटुंबात जन्म झालेल्या मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीच्या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंद करायची आहे. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीकडे विहित नमुन्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायचा आहे. ’पहली बेटी धन की पेटी, दुसरी बेटी तूप-रोटी’ असं सांगून घरात जन्माला येणार्‍या लेकीचं स्वागत करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीने घालून दिली आहे.

– सचिन सस्ते.


Back to top button
Don`t copy text!