• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

निरा – देवधर व कृष्णा – भिमा स्थिरीकरणाच्या कामांना गती देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
ऑगस्ट 12, 2022
in फलटण, सातारा जिल्हा

दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या भेडसावणाऱ्या शेती पाण्याचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून निरा-देवघर व कृष्णा-भिमा स्थिरीकरणाकडे बघितले जाते. निरा – देवघर व कृष्णा – भीमा स्थिरीकरणाच्या रखडलेल्या कामाला गती देण्याचे काम लवकर हाती घेणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या मूळ गावी आले असता त्यांचे स्वागत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात मतदारसंघातील विविध विकासकामांच्या बाबत प्रदीर्घ चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा व सोलापूर जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा व शेती पाण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या निरा – देवघर व कृष्णा – भीमा स्थिरीकरणाबाबत माहिती घेऊन निरा – देवघरचे रखडलेले व उर्वरित कामास मान्यता देवू.तसेच कृष्णा-भीमा स्थिरीकरणासंदर्भात विधिमंडळाकडून लवकरच या प्रकल्पाची मान्यता घेऊन दोन्हीही महत्त्वाकांशी प्रकल्पाच्या कामास लवकरच सुरुवात करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी खासदार निंबाळकरांना यावेळी दिला.

धोम धरणाचे पुराचे पाणी नदीत सोडून नदीकाठच्या गावातील लोकांच्या जिवीतास व मालमत्तेस धोका आणण्या ऐवजी त्यातील काही पाणी धोम बलकवडी कॅनॉल मध्ये सोडण्यात यावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली या संदर्भात ताबडतोब पाणी धोम धरणातून धोम बलकवडी कॅनॉल मध्ये सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे धोम धरणाचे पुराचे पाणी कॅनॉल मध्ये सोडण्यात येणार आहे.


Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तापोळा येथे नागरी सत्कार

Next Post

‘ऑडी क्यू३’च्या बुकिंगला सुरुवात

Next Post

'ऑडी क्यू३'च्या बुकिंगला सुरुवात

ताज्या बातम्या

फर्निचरचे दुकान आगीत खाक

मे 31, 2023

भाच्याने केला आत्याचा निर्घृण खून

मे 31, 2023

निरगुडी ग्रामपंचायतीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

मे 31, 2023

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार’ सौ. धनश्री बडवे यांना प्रदान

मे 31, 2023

माहेश्वरी समाजातील महेश नवमी शोभायात्रा आनंदात संपन्न

मे 31, 2023

माऊलींच्या पालखी सोहळ्यात अग्रभागी राहणार्‍या अंकली येथील अश्वांचे प्रस्थान

मे 31, 2023

‘एक्सएलआर ८ स्पोर्ट्स न्युट्रिशन’चा भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकशी सहयोग करार

मे 31, 2023

रमाई माता यांच्या स्मृतिदिनानिमित्त रासकर पार्क चौकाला क्रांतीसुर्य महात्मा फुले नाव देण्याचा सोहळा संपन्न

मे 31, 2023

अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करावी – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मे 31, 2023

मोदी सरकारने गोरगरिबांना विकासाच्या प्रवाहात आणले – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

मे 31, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!