
स्थैर्य, कोळकी, दि. ३० ऑक्टोबर : नीरा उजवा कालवा बंद झाल्यामुळे कोळकी गावाच्या पाणी नियोजनात बदल करण्यात आला आहे. कालव्यात पुढील ३० दिवस पाणी येणार नसल्याने, शुक्रवारपासून (दि. ३१) पूर्वीप्रमाणे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.
उपलब्ध पाण्याचा साठा मर्यादित असल्याने, सर्व नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

