कृष्णा मेडिकल कॉलेज येथील एकोणीस जण झाले कोरोना मुक्त


स्थैर्य, सातारा दि. 1 : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे 19 कोरोना बाधित रुग्ण आज पूर्णपणे बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, कृष्णा चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कराड चॅरिटेबलचे  हॉस्पिटलचे डीन डॉ.ए.वाय. क्षीरसागर, तसेच डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

या बाधित रुग्णांमध्ये  कराड तालुक्यातील उंब्रज येथील 40 वर्षीय पुरुष, म्हासोली येथील 37 वर्षीय महिला व 15 वर्षीय युवती, ढेबेवाडी फाटा येथील 23 वर्षीय युवक व 44 व 18 वर्षीय महिला. 

पाटण तालुक्यातील गावडेवाडी येथील 20 वर्षीय युवक शिराळ येथील 26 व 25 वर्षीय महिला, भरेवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, बनुपरी येथील 31 वर्षीय महिला 40,48,10, 19 वर्षीय पुरुष व 8 वर्षीय युवक, शितापवाडी येथील 40, 19 व 14 वर्षीय पुरुष असे 19 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!