दैनिक स्थैर्य । दि. ०८ सप्टेंबर २०२२ । सातारा । मतदार यादी अपडेट व अचूक असावी, याकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी आधारकार्डशी जोडण्याचा उपक्रम हाती घेतला असून त्यानुसार दि. 1 ऑगस्ट 2022 पासून मतदारयादी आधारकार्डशी जोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. या महिनाभरात जिल्ह्यातील 9 लाख 29 हजार 720 मतदार आधारशी जोडणेत आले आहेत.
त्यानुसार 255-फलटण :- 63 हजार 789, 256-वाई:- 1 लाख 28 हजार 414, 257-कोरेगाव:- 1 लाख 13 हजार 149, 258-माण:- 74 हजार 758, 259:-कराड उत्तर- 1 लाख 75 हजार 222, 260:-कराड दक्षिण- 1 लाख 38 हजार 319, 261 पाटण:- 1 लाख 54 हजार 038, 262:-सातारा – 82 हजार 031 अशा एकूण 9 लाख 29 हजार 720 मतदारांनी आज रोजीपर्यंत आपले मतदार ओळखपत्र आधारकार्डसोबत लिंक केले आहे.
जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या 25 लाख 72 हजार 780 इतकी आहे. निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासन जास्तीत जास्त मतदार ओळखपत्र आधार लिंक करण्यावर भर देत असून यासाठी जिल्ह्यात जागोजागी स्टॉल लावण्यात आले आहेत. यासोबतच काही विशेष शिबिरेसुद्धा आयोजित करण्यात येत असून यामध्ये आधार नोंदणीसाठी मतदारांकडून अर्ज क्रमांक 6 ब भरून घेतले जात आहेत.
तरी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने आपले मतदार ओळखपत्र आधारकार्ड सोबत लिंक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रुचेश जयवंशी व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) निता सावंत-शिंदे यांनी केले आहे.