निंबकर कृषी संशोधन संस्थेत प्रोजेक्ट/एक्स्टेन्शन ऑफीसरची जागा भरणे आहे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


फलटण येथील निंबकर कृषी संशोधन संस्था, पशूसंवर्धन विभाग येथे प्रोजेक्ट/एक्स्टेन्शन ऑफीसरची जागा भरायची आहे. पुरूष किंवा महिला चालेल.

खेडेगावात पशूसंवर्धन विषयक काम करण्याचा अनुभव असलेल्यांना, शेळ्या-मेंढ्यांची माहिती असलेल्या, शेळ्या-मेंढ्यांमध्ये लसीकरण वगैरे काम केलेल्या व ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्यांनी अर्ज करावा. नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळे काम करण्याची आवड व नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड असणार्‍यांना प्राधान्य.

वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये खेडेगावात बस किंवा मोटारसायकलने कामानिमित्त प्रवास करण्याची, प्रसंगी गावात अथवा जवळच्या शहर-गावात मुक्काम करण्याची, मर्यादित शारीरिक कष्टाची व कोणतेही काम करण्याची तयारी असलेल्यांनीच अर्ज करावेत.

पात्रता/ज्ञान/अंगभूत गुण याप्रमाणे पगार मिळेल.

शैक्षणिक पात्रता :

डेअरी डिप्लोमा आणि/किंवा BSc/BA पदवी,
एम.एस.सी. (अ‍ॅनिमल सायन्स किंवा डेअरी सायन्स), MSW यांना प्राधान्य.
अन्य पदवी असलेल्या, पण अनुभवी व्यक्तींनीही जरूर अर्ज करावेत.

इतर अपेक्षित कौशल्ये :

मराठीत उत्तम लिखाण करता यावे. (इंग्रजीचेही चांगले ज्ञान असणार्‍यांना प्राधान्य मिळेल), कॉम्प्युटर वापराचे व इंटरनेटचे चांगले ज्ञान असावे. (MS Word, Excel, Power Point),
फोन : ७५८८६८५८६७

ई-मेल : [email protected]


Back to top button
Don`t copy text!