राम निंबाळकर साहेब यांच्या पाठीशी निंबळक ग्रामस्थ; लोकसभेप्रमाणे विधानसभेला राम साहेबांचा निर्णय अंतिम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १५ नोव्हेंबर २०२४ | फलटण | काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निंबळक गावातून ५०० मतांच्या आसपास आघाडी दिली होती. याला केवळ राम निंबाळकरांचा असणारा गावातील विकास कार्याचा व ग्रामस्थांचा आपले पणाचा भाग कारणीभूत होता. आता होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा निंबळक गावाचे सुपुत्र तथा राज्यातील प्रसिद्ध उद्योजक राम निंबाळकर साहेब यांनी जो निर्णय घेतला आहे त्यांच्या सोबतच संपूर्ण निंबळक गाव राहणार आहे.

गेली २०-२५ वर्षे अखंडपणे निंबळक ग्रामपंचायत साहेबांच्या विचाराने वाटचाल करत आहे. आताच्या विधानसभेच्या निवडणुकीत सुध्दा राम निंबाळकर यांना मानणार्‍या कार्यकर्त्यानी घरोघरी जाऊन अजितदादा पवार साहेब यांच्या घड्याळ चिन्हाचे उमेदवार सचिन कांबळे-पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

यावेळी सुध्दा राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली निंबळक मध्ये घड्याळाला मोठी आघाडी मिळण्याची शक्यता दिसत आहे.

तालुक्यातील सत्ताधारी निंबळक मधील मताचा लोड कसा कमी करता येईल या विचारात असतात. परंतु अनेक वर्षे झाली इलाज सापडत नाही. निंबळकचे ग्रामस्थ गट-तट न पाहता तालुक्याचा विचार न करता राम निंबाळकर साहेब सांगतिल त्याच्या पाठीशी ठाम राहुन मताची आघाडी देत असतात.


Back to top button
Don`t copy text!