स्थैर्य, फलटण, दि. २६: बाल दिवस सप्ताहानिमित्त राज्य शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या भाषण आणि पत्रलेखन स्पर्धेत जिल्हा परिषद प्रा. केंद्रशाळा निंबळक ता. फलटण येथील स्वराज महेश ननवरे याने मी नेहरु बोलतोय या विषयावरील भाषण स्पर्धेत इयत्ता पहिली, दुसरी गटात आणि कल्याणी सचिन सावंत हिने चाचा नेहरु यांना पत्र या विषयावरील स्पर्धेत तिसरी ते पाचवी या गटात तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला. वर्ग शिक्षक रवींद्र जंगम, धोंडीराम बुधावले यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
भाषण स्पर्धेत जिल्हा परिषद प्रा. शाळा पवारवाडी विडणी, ता. फलटण येथील ईश्वरी विकास जगताप आणि संघर्ष नीलेश जगताप या बहीण भावाने तालुक्यात अनुक्रमे प्रथम आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. मुख्याध्यापक मारुती गिरमे, वर्गशिक्षिका मनीषा जंगम, यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
बालदिवस स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि गुणवत्ता प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थी/विद्यार्थिनींचे सभापती श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर, उपसभापती सौ. रेखाताई खरात, सर्व पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार, प्रभारी गट शिक्षणाधिकारी रमेश गंबरे यांच्यासह अनेकांनी विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.