निकोप हॉस्पिटल फलटणला, N. A. B. H. अभिमानास्पद मानांकन : डॉ. जे. टी. पोळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ डिसेंबर २०२१ । फलटण । कृष्णामाई मेडिकल रिसर्च फौडेशन संचलित निकोप हॉस्पिटल, फलटणला N. A. B. H. (नॅशनल अक्रीडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स & हेल्थ केअर प्रोव्हायडर्स) या अभिमानास्पद मानांकनाने नुकतेच गौरविण्यात आले आहे.

समाजाचे आरोग्य निकोप, निरामय ठेवण्यात दि. ९ जानेवारी १९९५ पासून रौप्य महोत्सवी तपोपूर्ती नंतरही सतत अग्रभागी असलेल्या निकोप हाॅस्पिटलच्या शिरपेचात हा आणखी एक मानाचा तूरा विराजमान झाला आहे.

सर्वाना येणार्‍या नववर्षाच्या पूर्वसंध्येला मनाःपासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करीत असतानाच हा संदेश प्राप्त झाल्याचे निकोपचे सर्वेसर्वा डाॅ. जे. टी. पोळ, डाॅ. सौ. सुनिता पोळ व कुटुंबियांनी कळविले आहे.

प्रामुख्याने हृदयरुग्ण, सर्प दंश, अपघातातील गंभीर रुग्ण व अन्य आजारातील गंभीर रुग्णावर खात्रीचे उपचाराची सुविधा, विशेषतः कॅथलॅब, उत्तम सी. टी. स्कॅन, एम. आर. आय. डायलिसीस, सुसज्ज आय. सी. यू. वगैरे सर्व वैद्यकीय साधने सुविधा, सुसज्ज लॅब यासह स्वतः डॉ.जे. टी. पोळ M. D. Medicine आणि डॉ. सौ. सुनीता पोळ त्यांच्या जोडीला अन्य तज्ञ डॉक्टर्स येथे असल्याने उत्तम वैद्यकीय सेवेचे हे केंद्र गेली ३०/३५ वर्षे फलटणकरांच्या अखंड सेवेत कार्यरत असल्याचे नमूद करीत कोरोना काळातही कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र आणि अन्य रुग्णांसाठी स्वतंत्र दालने उपलब्ध असल्याने सर्व रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देण्यात डॉ. जे. टी. पोळ व त्यांचे सहकारी यशस्वी झाल्याचे डॉ. बिपीन शहा यांनी स्पष्ट केले.

विविध साधने सुविधांसह दर्जेदार सुविधा

निकोप मध्ये आज Trauma Centre, Well – equipped ICU, Cathlab, Whole Body Multisplier C T Scan, Dialysis Centre, Whole Body Color Doppler & 2D Echo, Sonography & Digital X-Ray, Computerized ECG, EEG, PFT, Ultra Modern Pathology Lab, Endoscopy, Kidney Stone Care, Well – equipped Operation Theatres.

डॉ. पोळ दाम्पत्य अहोरात्र रुग्ण सेवेत
वर उल्लेखिलेल्या सर्व साधने, सुविधांनी सुसज्ज निकोप चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व एकाच छताखाली उपलब्ध करुन दिले आता आपले काम संपले, केवळ व्यवस्थापन सांभाळणे एवढेच आपले काम असे न मानता डॉ. जे. टी. पोळ, डॉ. सौ. सुनीता पोळ रात्रंदिवस मेहनत घेऊन योग्य निदान, दर्जेदार उपचार आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा यासाठी न थकता प्रयत्नशील असतात, रुग्ण व नातेवाईक समाधानी झाल्यावर हे दोघे व त्यांचे सहकारी समाधानी होतात हे निकोपचे वैशिष्ट्य आहे.
कृष्णामाई मेडिकल & रिसर्च फौंडेशन संचलित निकोप हॉस्पिटलच्या विश्वस्त व खजिनदार म्हणून डॉ. सौ. सुनीता पोळ यांची मोलाची साथ या कामात डॉ. जे. टी. पोळ यांना लाभत आहे. त्या कन्सलटिंग पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. निकोप हॉस्पिटल, प्रतिभा हॉस्पिटल सातारा यांच्या त्या संचालिका आहेत. फलटण मेडिकल फौंडेशन संचलित रक्त पेढीच्या इनचार्ज आहेत. LIC of India आणि विविध विमा कंपन्यांच्या त्या अधिकृत पॅथॉलॉजिस्ट आहेत. डॉ. जे. टी. पोळ आणि निकोप हॉस्पिटलच्या संपूर्ण यशामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सेवा
निकोप सुपर स्पेशालिटी मध्ये भूलतज्ञ डॉ. सौ. जान्हवी पोळ चिरडे M. D. Anaesthesia,
डॉ. उज्वल चिरडे (जावई) : प्लास्टिक, फेसीओ मॅक्झिलरी, व्हॅस्कुलर व पोस्ट बर्न रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी,
डॉ. सौ. देवयानी पोळ देशमुख M. D. Dermatology,
डॉ. प्रणव देशमुख शेंडे (जावई) M. D. D. M. Cardiology. यांची सेवा लाभत असते.
विविध शासकीय योजना व विमा कंपन्यांच्या कॅशलेस सेवा उपलब्ध
निकोप हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, पंतप्रधान जन आरोग्य योजना, महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना, बी. एस. एन. एल., कामगार विमा योजना, कमिन्स इंडिया यांच्या कॅशलेस सुविधा आणि जवळपास ४० विमा कंपन्या टी. पी. ए. कंपन्यांची सेवा निकोपमध्ये उपलब्ध आहे.

निकोप आणि डॉ. पोळ यांचा गौरव
डॉ. जे. टी. पोळ आणि निकोप हॉस्पिटल यांना प्राप्त झालेल्या विविध सामाजिक गौरवांचा थोडक्यात महत्वाच्या पुरस्कारांचा आढावा – फेमस पर्सनलिटी रेफरन्स इंडिया बायोग्राफिक नामनिर्देश, क्रांती गौरव पुरस्कार सातारा, जनसेवा सद्भावना पुरस्कार नवी दिली, स्वामी विवेकानंद कृतज्ञता गौरव पुरस्कार कराड, नाना हर्षे जीवन गौरव पुरस्कार रत्नागिरी, नॅशनल अचिव्हमेंट अवॉर्ड नवी दिल्ली, सातारा भूषण पुरस्कार मौनी विद्यापीठ गारगोटी कोल्हापूर, श्वास फौंडेशन इंडिया गुण गौरव पुरस्कार, बेस्ट लायन प्रेसिडेंट लायन्स क्लब इंटर नॅशनल अवॉर्ड, जैन सोशल इंटर नॅशनल बेस्ट सोशल सर्व्हिस पुरस्कार, डॉ. रेड्डीज लॅबरोटरी हेल्थ प्रोग्रॅम सहभाग लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद, कै. शंकरराव जगताप शैक्षणिक व सामाजिक प्रबोधिनी महाराष्ट्र समाज भूषण पुरस्काराने मंत्रालयात सन्मान, खा. उदयनराजे मित्र समूह सातारा यांचा गौरव पुरस्कार, महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहीगाव गौरव पुरस्कार.


Back to top button
Don`t copy text!