निकोप हॉस्पिटल फलटण हे कोविड १९ हॉस्पिटल म्हणुन अधिग्रहित; जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आदेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत स्तरावर कोरोना विषाणु बाधित रुग्ण आढळत आहेत. सद्यःस्थितीत आपल्या जिल्हयात कोरोना विषाणु बाधित रुग्णांमध्ये मोठया प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. यापुढील काळात संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षता घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणुचे संसर्गात अधिक वाढु होवु न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. सदर बाधित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती सातारा जिल्हयात उद्भवु नये यासाठी पुर्वतयारी करणे अगत्याचे झाले आहे. कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन अत्यावश्यक सेवेसाठी फलटणचे निकोप हॉस्पिटल हे हॉस्पिटल कोव्हीड १९ बाधित रुग्णांवर उपचार करणेसाठी पुढील आदेश होईपर्यत अधिग्रहित करण्यात येत आहे. असे आदेश सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निर्गमित केलेले आहेत. या आदेशानंतर फलटण तालुक्यामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणुचा (कोविड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा दिनांक १३ मार्च २०२० पासुन लागु करुन खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोटकलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत या अधिकारानुसार शेखर सिंह यांनी आदेश निर्गमित केलेले आहेत.  

निकोप हॉस्पिटल मधील चल अचल साहित्यासह कार्यरत असणारा सर्व स्टाफ अधिग्रहित करण्यात आलेला आहे. हॉस्पिटल प्रशाशनाने हॉस्पिटल मध्ये सुसज्ज असा ५० खाटांचा सुसज्ज विलगीकरण कक्ष तयार करुन सदर कक्षात व्हेंटीलेटर व इतर आवश्यक गोष्टीची तयारी ठेवण्यात यावी. तसेच रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुसज्ज ठेवुन Throat Swab घेण्याची तयारी करावी. सदर आदेश तात्काळ अमलात येईल याची दक्षता घेण्यात यावी,  असेही सातारचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शेखर सिंह यांनी स्पष्ट केलेले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!