दैनिक स्थैर्य । दि. २० ऑक्टोबर २०२२ । फलटण । राजाळे ता. फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते आणि शंभु सेना जिल्हा अध्यक्ष निखिल तानाजीराव निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजाळे गावातील अंगणवाडी, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले तसेच वृक्षरोपन तसेच विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.
यावेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गावडे तसेच त्यांचा सर्व शिक्षक स्टाफ, माजी पंचायत समिती सदस्य महावीर भालेराव, ग्रामपंचायत सदस्य हणमंत गुरव, संदिप पवार, अजितराव निंबाळकर, आनंदराव ननावरे, अरुण यादव, विजय शिनगारे, नुराभाई शेख, मोहन कुंभार, अमर निंबाळकर उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त निखील निंबाळकर यांना विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण, बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी शुभेच्छा दिल्या.