स्थैर्य ,सातारा, दि.०१: नेक्सझू मोबिलिटी या भारतातील अग्रेसर, एंड-टू-एंड शाश्वत मोबिलिटी प्रदाता कंपनीने सर्वोत्कृष्ट ईव्हीच्या पोर्टफोलिओमध्ये आता रॉम्पस+ ही आणखी एक आधुनिक इलेक्ट्रिक सायकल जोडली आहे. रॉम्पस+ ही नावीन्यपूर्ण ३स्पीड ईव्ही स्कूटर किंवा सायकलसारखीदेखील वापरता येते.
रॉम्पस+ सायकल पॉवरफुल ३६व्ही, २५० वॉट्स हब बीएलडीसी मोटरवर धावते व अद्वितीय अशा पॉवरफुल राइ़डचा अनुभव देते. ३६व्ही, ५.२ एएच लिथियम-आयॉन बॅटरीसह ती प्रभावी ७५० सायकल बॅटरी लाइफ असून ती फक्त २.५ ते ३ तासात पूर्ण चार्ज होते. २५ किमी प्रति तास अशा आरामादायी स्पीडसह ऑटो कटऑफ फीचर्स असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण ईव्हीमध्ये थ्रॉटल मोडवर २५ किमी रेंजमध्ये रायडिंगची सुविधा मिळते. तसेच इको पेडेलेक मोडमध्ये ३५ किमी धावते. रॉम्पस+ची किंमत ३१,९८३ रुपये असून ही लाल, निळा, काळा आणि चंदेरी अशा आकर्षक मेटलिक रंगात उपलब्ध आहे. अॅसेसरीजच्या संपूर्ण सेटसह रॉम्पस+ ही आरमदायी, सुलभता आणि आकर्षक डिझाइनचे मिश्रण आहे.
लक्षवेधी डिझाइन व कोल्ड रोल स्टील अॅलॉयची मजबूत फ्रेमसह यात इन-बिल्ट हॉर्न व हे़डलाइट, २६” टायर्स टिकाऊ फ्रंट सस्पेंशनसह, ड्युएल डिस्क ब्रेक आहेत, जेणेकरून प्रत्येक राइडचा आनंद घेताना तुम्हाला सुरक्षितदेखील वाटेल. मोटर व बॅटरीलाही १८ महिन्यांची वॉरंटी असून ब्रँडचा ग्राहक केंद्रिकृत दृष्टीकोन यातून वृद्धींगत होतो.
देशाच्या आत्मनिर्भरतेच्या मोहिमेसोबत चालतानाच ‘व्होकल फॉर लोकल ब्रँड’ अशी भूमिका नेक्सझूची आहे, त्यातूनच रॉम्पस+ सुपरसायकल २०२१ ची आवृत्ती तयार झाली आहे. भारतात डिझाइन व निर्मिती झालेली रॉम्पस+ ही दैनंदिन प्रवाशांसाठी तसेच व्यवसायिकांसाठी उपयुक्त आहे. नेक्सझू मोबिलिटीच्या डीलरशिपमध्ये किंवा वेबसाइटवर ही सुपरसायकल उपलब्ध आहे. अॅमेझॉन व पेटीएम मॉलवर ती लवकरच लाँच केली जाईल.
नेक्सझू मोबिलिटीचे सीएमओ श्री पंकज तिवारी म्हणाले, “अनेक महिने सखोल संशोधन केल्यानंतर हे आनंनदायी उत्पादन तयार झाले आहे. रॉम्पस+ सुपरसायकलचे लाँचिंग करताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. आजपर्यंत आम्ही डिझाइन केलेल्या सर्वात पॉवरफुल व नावीन्यपूर्ण डिझाइनच्या ईव्ही पाहता, एवढी वैविध्यपूर्ण, आरामदायी आणि लोकांना भविष्याच्या दृष्टीने समृद्ध अशी वाहने तयार केल्याबद्दल आम्ही अभिमान बाळगतो. रॉम्पस+ ही पहिली ईव्ही पुण्याच्या चाकणमधील फॅक्टरीत नव्याने तयार झालेली असून ती आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार वाढवण्याला तसेच वाहतुकीच्या भविष्याचे विद्युतीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या आमच्या उद्दिष्टाच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे.”