नेक्स्ट एज्युकेशनचा ब्लूम्झ इंटरनॅशनल स्कूलसह सहयोग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० जानेवारी २०२३ । गोवा नेक्स्ट एज्युकेशन या भारतातील अग्रगण्य शैक्षणिक सोल्यूशन्स प्रदाताने ब्लूम्झ इंटरनॅशनल स्कूल, गोवासह सहयोग केला असून दर्जेदार शिक्षणाचे प्रगत स्तर उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये साह्य करत आहे. नेक्स्ट एज्युकेशनसोबतच्या सहयोगाच्या माध्यमातून स्कूलने आपल्या अभ्यासक्रमामध्ये आधुनि‍क तंत्रज्ञान सुधारणांचा यशस्वीरित्या समावेश केला आहे, जसे व्यापक डिजिटल कन्टेन्ट असलेले स्मार्ट क्लासरूम सोल्यूशन, सर्व शैक्षणिक व प्रशासकीय गरजांची पूर्तता करण्यासाठी एण्ड-टू-एण्ड सोल्यूशन, एनईपी २०२० मार्गदर्शकतत्त्वांनुसार सर्वसमावेशक अभ्यासक्रम सोल्यूशन. हे सोल्यूशन्स स्मार्ट अध्ययन टप्पा सादर करतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक अध्ययन दृष्टीकोन मिळेल.

सर्वोत्कृष्ट शैक्षणिक वितरण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्कूलने नेक्स्ट एज्युकेशनच्या ‘अकॅडेमिक पार्टनरशिप प्रोग्राम’ची निवड केली, जो शिक्षकांचे प्रशिक्षण, शैक्षणिक नियोजन व अंमलबजावणी, विद्यार्थ्यांसाठी ऑडिट व मूल्यांकन यावर लक्ष केंद्रित करतो. अकॅडेमिक पार्टनरशिप प्रोग्रामची निवड करून ब्लूम्स इंटरनॅशनल स्कूल भारतभर पसरलेल्या नेक्स्ट एज्युकेशन्स अकॅडेमिक पार्टनरशिप शाळांसोबत ज्ञानाची देवाणघेवाण इत्यादी करू शकते. शिकण्याच्या आवडीनिवडी व अभिरुचीनुसार हे विद्यार्थ्यांना त्यांच्या कमकुवततेची क्षेत्रे शोधण्यात मदत करते आणि अनुकूल सराव मॉड्यूल व अभ्यासक्रम प्रस्तावित करते.

नेक्स्ट एज्युकेशन इंडिया प्रा. लि.चे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी बियास देव राहन म्हणाले, ‘‘वर्षानुवर्षे नेक्स्ट एज्युकेशन नेटवर्कच्या उत्क्रांतीमुळे आम्हाला देशभरात स्मार्ट शिक्षणाची इकोसिस्टम तयार करण्यास मदत झाली आहे. ब्लूम्स इंटरनॅशनल स्कूलसोबतचा आमचा सहयेाग देशातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासाला चालना देणारी एआय-आधारित शिक्षण प्रणाली तयार करण्याच्या एक पाऊल पुढे घेऊन जातो आणि त्यांना मागणीनुसार कौशल्यांसह सक्षम बनवतो.’’


Back to top button
Don`t copy text!