शांत, संयमी पण तडफदार नेतृत्व “आमदार सचिन पाटील”

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन सुधाकर पाटील यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा…

लोकनेते स्व. हिंदुराव यांच्या मुशीत घडलेला हाडाचा कार्यकर्ता

माजी खासदार स्व. लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या मुशीमध्ये अनेक कार्यकर्ते घडले आहेत. लोकनेत्यांच्या तालमीत जे कार्यकर्ते घडले आहेत, त्यांनी नेत्यांच्या नंतर रणजितदादा खासदार होईपर्यंत एकदाही जिल्ह्यात व राज्यात सत्ता उपभोगली नाही. त्यांना नेहमीच संघर्ष करावा लागत होता. त्यामधील एक धडाडीचे कार्यकर्ते म्हणजे फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन सुधाकर पाटील हे होय.

नेत्यांच्या तालमीत कार्यकर्ता तयार झाला म्हणजे तो सर्वांगाने तयार असतो, परंतु त्याला सचिन पाटील अपवाद म्हणावे लागतील. कारण नेत्यांच्या तालमीत तयार होऊन सुद्धा त्यांच्याकडे शांत व संयमी स्वभाव आहे. आमदार सचिन पाटील यांची समाजकारणातील एन्ट्री ही लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात झाली होती.

रणजितदादा व समशेरदादांची खंबीर साथ

माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यापासून सचिन पाटील यांनी तळागाळात काम करणे पसंत केले होते. ते कधीही प्रसिद्धीच्या झोतात आले नाहीत किंबहुना सचिन पाटील हे प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहत होते. नेत्यांनी शिकवण दिल्याप्रमाणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी व जनतेशी ते नेहमीच थेट संपर्कात असत. त्यामुळे जनतेच्या मनाचा कौल त्यांना नेहमीच कळत असे.

आमदार सचिन सुधाकर पाटील यांनी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये प्रवेश केल्यापासून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची कायमच त्यांना खंबीर अशी साथ लाभलेली आहे. सचिन सुधाकर पाटील यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पूर्वी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात व त्यानंतर भारतीय जनता पार्टीत काम करण्याची संधी दिली होती. त्यामुळे त्यांचे राजकारण सुरुवात झाली.

पहिल्याच निवडणुकीत विजयश्री मिळवत सत्ताधारी गटाला सुरुंग

गत काही महिन्यापूर्वी संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सचिन सुधाकर पाटील यांनी आयत्या वेळी भारतीय जनता पार्टीच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधून तिकीट घेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत निवडणूक लढवली व आयुष्यामध्ये लढवलेल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये गत 30 वर्षे सत्तेत असणाऱ्या राजे गटाला सुरुंग लावण्यात सचिन पाटील यशस्वी झाले. यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले होते. विधानसभा निडवणुकीच्या पूर्वी कधीही ग्रामपंचायत सदस्य नसलेला सर्वसामान्य शेतकऱ्याला आमदार करण्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मोलाचे कष्ट आहेत.

लोकसभेला रणजितदादा पराभूत तर विधानसभेला सचिन पाटील विजयी

सहा महिन्यात लोकसभा निवडणूक आधी व त्यानंतर विधानसभा निवडणूक संपन्न झाली. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पराभूत करण्यात त्यांचे सर्व विरोधक एकत्रित येत रणजितदादांचा पराभव करण्यात ते यशस्वी सुद्धा झाले. त्यानंतर रणजितदादा हे फारसे राजकारणात रमणार नाहीत, अशी आशा त्यांच्या विरोधकांना होती. परंतु ज्या मैदानावर हार पत्करली तेच मैदान पुन्हा आपण मारायचे व जिंकायचे हि रणजितदादांची भूमिका होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या नंतर तातडीने ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले व विधानसभेचे मैदानात विरोधकांना एकत्रित करणाऱ्या मास्टर माईंडच्या उमेदवाराचा शांत राहत परफेक्ट कार्यक्रम केला. यामध्ये लोकसभेला रणजितदादा पराभूत झाले तरी सुद्धा विधानसभेला सचिन पाटील यांना विजयी केले.

आमदार सचिन पाटील हे राष्ट्रवादीचे पक्के शिलेदार

पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पार्टीचे सच्चे कार्यकर्ते सचिन सुधाकर पाटील यांनी विधानसभेचे तिकीट मिळाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सच्चे शिलेदार बनले आहेत. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आमदार सचिन पाटील हे सुद्धा चांगलेच ऍक्टिव्ह झाले आहेत. यामध्ये फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक जनतेच्या महत्वाच्या असणाऱ्या सर्व समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच कटिबद्ध असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत सुद्धा सचिन पाटील हे ऍक्टिव्ह आहेत. अगदी राज्यस्तरीय, जिल्हा स्तरीय व मतदारसंघात सुद्धा राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरहिरीने भाग घेत असतात.

आमदार साहेब, फलटणचा सर्वांगीण विकास करा; हीच नागरिकांची अपेक्षा

आमदार सचिन सुधाकर पाटील यांनी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून येताना उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणच्या जनतेच्या समोर बारामती मॉडेल ठेवले आहे. त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी ही आमदार सचिन पाटील यांच्या खांद्यावर आली आहे. फलटणच्या जनतेच्या समोर बारामती मॉडेल ठेवल्याने सचिन पाटील यांना मतांची चांगली आघाडी मिळाली आहे. आगामी काळात नक्कीच फलटणचा विकास करण्याची जबाबदारी हि आमदार साहेब तुमच्या खांद्यावर आहे.

– एक हितचिंतक.


Back to top button
Don`t copy text!