दैनिक स्थैर्य | दि. १० डिसेंबर २०२४ | मुंबई | फलटण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील यांनी रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
फलटण विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाकडून आमदार सचिन पाटील हे माजी आमदार दीपक चव्हाण यांना पराभूत करून पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले आहेत.