वेंगुर्ला शहर नळ पाणीपुरवठा योजनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण


दैनिक स्थैर्य । दि. १७ फेब्रुवारी २०२३ । सिंधुदुर्गनगरी ।  वेंगुर्ला शहर नळ पाणीपुरवठा योजना टप्पा क्रमांक २, निशाण धरणाची उंची २.५ मीटरने वाढविणे आणि वेंगुर्ला नवाबाग बीच येथील जलबांदेश्वर मंदिर जवळ बांधण्यात आलेल्या झुलत्या पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, उपविभागीय अभियंता संजय दहिफळे आदी उपस्थित होते.

माझा वेंगुर्ला पतंग महोत्सवाचे उद्घाटनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!