स्थैर्य, दि.३१: नवीन वर्षाचे स्वागत, म्हणजे जमिनीवर थिरकणारी पावले आणि आकाशात होणारी आतषबाजी. 2021 च्या स्वागतासाठी जगातील बर्याच देशांमध्ये असाच उत्सव साजरा होईल, परंतु कोरोनामुळे काही सावधगिरी बाळगली जाईल. आता थिरकताना आपल्या आसपास किती लोक आहेत हे पहावे लागेल. मास्कचा वापर करावा लागेल. इतकेच नाही तर जल्लोषाचे वातावरण किती सुरक्षित आहेत यासाठी कोव्हिड ट्रॅकिंग अॅपवर नजर ठेवावी लागेल.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतावर कोणताही बंदी नाही. तसेच अनेक देशांमध्ये विविध प्रकारचे निर्बंध असतील. काही देशांमध्ये उत्सव होईल, परंतु लोक त्यात ऑनलाइन सामील होऊ शकतील.
तर आपण जाणून घेऊया जगातील महत्वाच्या शहरांमध्ये 2021 चा उत्सव कसा साजरा केला जाईल आणि 2020 च्या तुलनेत हे किती वेगळी असतील…
थायलंड : गर्दीला झोनमध्ये विभाजित करून सेलिब्रेशन केले जाईल, कोविड ट्रॅकिंग अॅप आवश्यक
- कोरोना संकटात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी थायलंडने योजना तयार केली आहे. यामुळे सेलिब्रेशन तर होईल, परंतु संक्रमणाचा धोका कमी राहिल. या योजनेनुसार गर्दीचे गट पाडून वेगवेगळ्या झोनमध्ये वळवले जातील. सेलिब्रेशन मध्ये सामील होणाऱ्या लोकांकडे कोविड-19 ट्रॅकर अॅप असणे आवश्यक आहे. जेणेकरून आजूबाजूला संक्रमण झाल्यास सतर्क होता येईल.
- थायलंडमधील अनेक शहरांमध्ये उत्सव साजरा केला जाईल. पण पटायामध्ये नवीन वर्षाचा उत्सव रद्द करण्यात आला आहे. बँकॉकचे शॉपिंग कॉम्प्लेक्स सेंट्रल वर्ल्ड दिव्यांनी झगमगत आहे. येथे नवीन वर्षात मोठी गर्दी होत असते. या वर्षीही येथे लोक दाखल होत आहेत. हा जगातील 11 वा सर्वात मोठा शॉपिंग मॉल आहे.
म्युझिक कॉन्सर्ट रद्द, स्वदेशी पर्यटकांना 40% पर्यंत सूट :
- बँकॉकमध्ये 15 जानेवारी रोजी होणारा म्युझिक कॉन्सर्ट रद्द केला आहे. येथील अर्थव्यवस्था पर्यटनावर आधारित आहे, मात्र सध्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी इकडे पाठ फिरवली आहे. यामुळे थायलंड सरकार स्वदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल आणि हवाई प्रवासावर 40% सवलत देत आहे.
न्यूझीलंड : कुठल्याही निर्बंधाशिवाय 5 मिनिटांच्या आतषबाजीने होणार सेलिब्रेशनला सुरुवात
- न्यूझीलंडचा त्या देशांमध्ये समावेश आहे, जेथे नवीन वर्ष सर्वात आधी येते. भारतात संध्याकाळचे सुमारे 4.30 वाजतात तेव्हा न्यूझीलंडमध्ये रात्री 12 वाजत असतात. नवीन वर्षाचा सर्वात पहिला मोठा कार्यक्रम न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये साजरा केला जाणार आहे. येथील हार्बर पुलावर 5 मिनिटांच्या आतषबाजीने नवीन वर्षाचे स्वागत होणार आहे.
- ऑकलंड हे निर्बंध नसलेले जगातील पहिले मोठे शहर: न्यूझीलंडमधील ऑकलंड जगातील एकमेव मोठे शहर आहे, जिथे नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोणतेही निर्बंध नाहीत. यामागील कारण म्हणजे येथील व्यवस्थापन. कोरोनाला आळा घालण्यासाठी न्यूझिलंडच्या सरकार आणि प्रशासनाने उत्तम व्यवस्थापन आणि जनतेच्या जागृकतेने येथे कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर ताबा मिळवला आहे.
स्कॉटलंड : येथे व्हर्च्युअल सेलिब्रेशन मध्ये सामील होणार सेलिब्रिटी, जेणेकरून लोकांना एकटे वाटू नये
- स्कॉटलंडच्या एडिनबर्गमध्ये नवीन वर्षाच्या उत्सवावर बंदी घातली गेली असली तरी पर्याय तयार आहे. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी ऑनलाइन कार्यक्रमाची तयारी केली आहे. याचे थेट प्रक्षेपण 28 डिसेंबरपासून सुरू झाले आहे. याशिवाय येथे ड्रोन शोचे आयोजन केले जाईल जे थेट प्रक्षेपण केले जातील.
- हे सेलेब्स वाढवणार शान : नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी ऑनलाइन कार्यक्रमांमध्ये डेव्हिड टेनेंट, स्लोबॅन रेडमंड, लोर्ना मॅकफॅडन यांच्यासह अनेक स्कॉटिश सेलिब्रिटी उपस्थित राहतील. जेणेकरून लोकांना त्यांच्या घरात एकटे वाटू नये.
इंग्लंड : लंडन नक्कीच सजणार, परंतु आनंद घेण्यासाठी इव्हेंटमध्ये लोक राहणार नाहीत
- गेल्या दोन दशकांपासून थेम्स नदीकिनारी लंडनच्या रस्त्यांवर होणाऱ्या पार्ट्या यावेळी होणार नाहीत. लंडनचे महापौर सादिक खान यांनी नवीन वर्षाचा कार्यक्रम रद्द केला आहे. परंतु लंडनला दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य पद्धतीने सजवले जाईल. येथील सजावट आणि फटाक्यांचे थेट प्रक्षेपण केले जाईल जेणेकरुन जगभरात टीव्हीवर पाहता येतील.
- 1 लाख लोक आतषबाजी पाहण्यासाठी जात होते : थेम्स नदीकिनारी होणारी आतिशबाजी पाहण्यासाठी येथे दरवर्षी 1 लाख लोक येत होते. यासाठी तिकिटे ठेवली जात होती. 2019 मध्ये या कार्यक्रमासाठी सुमारे 22 कोटी रुपये खर्च केले होते.
अमेरिका : टाइम्स स्क्वेअरवर नवीन वर्षाचे काउंटडाऊन होईल, परंतु व्हर्च्युअली पाहता येईल
- 24 तास रोषणाईसाठी प्रसिद्ध असलेल्या न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री गर्दी होणार नाही. 31 डिसेंबरची संध्याकाळ होताच न्यूयॉर्क पोलिस सामान्य लोकांना टाईम्स स्क्वेअरवर जाण्यास बंदी घालतील. मात्र लोकांना व्हर्च्युअली नवीन वर्षाचे काउंटडाऊन आणि बॉल ड्रॉप पाहता येतील. यावर्षी टाइम्स स्क्वेअरवर 7 फुटांचा न्यूमेरल्स ठेवले जाणार आहे.
सिडनी : नवीन वर्षानिमित्त प्री-बुकिंग असलेल्या पर्यटकांना रेसस्त्रामध्ये प्रवेश मिळेल
- जगभरातील नवीन वर्षांचे बहुतांश कार्यक्रम रात्रीच साजरे होतात, मात्र ऑस्ट्रेलियन लोकांच्या सेलिब्रेशनचा अंदाज थोडा वेगळा आहे. 31 डिसेंबरच्या दुपारपासूनच सिडनीच्या हार्बर ब्रिजवर फेरी रेस, संगीत कार्यक्रम आणि सैन्य प्रात्यक्षिके होत असतात. मात्र यावर्षी हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. नव्या वर्षाच्या दिवशी हार्बर ब्रिजवर ज्यांचे आधीच रेस्टॉरंटमध्ये बुकिंग आहे अशांना प्रवेश दिला जाईल.
- प्रदूषण कमी करण्यासाठी यंदा आतषबाजी कमी होणार : कोरोनाची सोशल डिस्टन्सिंग आणि बुशफायरचे प्रदुषण पाहता यावर्षी आतषबाजी कमी केली जाणार आहे. सैन्य प्रदर्शनासंबंधी कार्यक्रमात प्रेक्षक नसणार. लोक व्हर्च्युअली हे कार्यक्रम पाहू शकतील.
- सिडनी प्रशासनाने घोषणा केली की, कोरोनाच्या केसमध्ये वाढ झाल्यास सर्व कार्यक्रम रद्द केले जाऊ शकतात. दरम्यान उत्तर भागात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. येथील डॉक्टर्स नवीन वर्षांच्या सेलिब्रेशन रद्द करण्याची मागणी करत आहेत, मात्र तरीही सरकारने उत्सवाच्या तयारीवर बंदी घातली नाही.
तैवान : येथे निर्बंध नाहीत, नवीन वर्षानिमित्त ट्रान्सपोर्टवर मिळणार सूट, विशेष बस आणि रेल्वे धावतील
- तैवानमध्ये एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत कोरोनाचे एकही रुग्ण आढळला नाही, मात्र डिसेंबरमध्ये एका रुग्णांची नोंद झाली. असे असूनही येथील उत्सव थांबणार नाही. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तैवान सरकारने कोणतेही निर्बंध घातले नाही. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीत विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. न्यू ईयर पार्टीत प्रवेशासाठी चेक पॉइंट्स निश्चित केले आहेत. मास्क आणि शरीराचे तापमान तपासल्यानंतरच प्रवेश दिला जाईल.
- कॉन्सर्टसाठी विशेष बस आणि गाड्या धावतील : प्रसिद्ध तैवानी पॉप गायक दीवा नवीन वर्षाच्या संध्याकाळी तिच्या शहरात एक मोफत कॉन्सर्ट करणार आहे. या कॉन्सर्टसाठी विशेष बस सोडण्यात येणार आहेत. तैवानचे रेल्वे प्रशासन नवीन वर्षाच्या संध्याकाळी 3 विशेष गाड्यादेखील चालवणार आहे.
दुबई : खासगी पार्टी आणि मेळाव्यावर बंदी, कॉन्सर्टसाठी घ्यावी लागेल परवानगी
- दुबईत 2021 चे सेलिब्रेशन फिके राहणार आहे. कॉन्सर्टसाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल. राष्ट्रीय आपत्कालीन संकट आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते डॉ. सैफी यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. येथील सर्वात मोठे आकर्षण बुर्ज खलिफा राहणार आहे. यावेळी येथील आतषबाजी पाहण्यासाठी अॅपवर प्री-बुकिंग करावी लागेल. बुकिंग नंतरही सामाजिक अंतर कायम ठेवावे लागेल आणि मास्क घालणे आवश्यक असेल.