४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑगस्ट २०२३ | फलटण |
सातारा जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाकडून जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ मधून घाडगेवाडी (ता. फलटण) येथे नवीन पशूवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ मंजूर करण्यात आला आहे. या दवाखान्यासाठी अंदाजे २५ लाख रुपये खर्च येणार आहे. विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांच्या माध्यमातून सदरील पशूवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्यात आला आहे.
घाडगेवाडी येथे नवीन पशूवैद्यकीय दवाखाना मंजूर झाल्याने या परिसरातील पशूपालक शेतकर्यांचा आपल्या जनावरांच्या आजारपणात खाजगी डॉक्टरांमार्फत घ्यावी लागणारी सेवा व त्यावर होणारा मोठा खर्च या मोठी बचत होणार असल्याने या शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.