फलटण तालुक्यात ‘वी’ चे नवीन टॉवर्स गरजेनुसार वाढवले

‘वी’ स्टोअरचे ओंकार शहा यांची माहिती


दैनिक स्थैर्य । 25 मे 2025। फलटण । सध्याचा वेगवान जगात वावरताना नेटवर्कची गरज प्रत्येकाला आहे. या गोष्टीचा विचार करता वोडाफोन आयडिया लिमिटेड अर्थात ‘वी’ ने आपल्या नेटवर्क देणार्‍या टॉवर्स ची संख्या गरजे नुसार वाढवली आहे. फलटण तालुक्यातील झिरपवाडी, सोमंथली, फडतरवाडी, वडले, मठाचीवाडी, साठे,कुरवली या गावात नुकतेच नव्याने टॉवर्स उभारले गेलेची माहिती फलटण येथील वोडाफोन आयडिया लिमिटेड ‘वी’ चे ओंकार शहा यांनी दिली.

ओंकार शहा म्हणाले, फलटण तालुक्यात कोणत्याही भागात नेटवर्क संदर्भात आपण कव्हरेज वाढण्यासाठी कटिबद्ध आहोत. येत्या काही दिवसात फक्त नेटवर्कच वाढले नाही तर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अनेक युवा तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. आमचे नेटवर्क टीमचे शुभम लाळगे यांनी कार्यभार घेतल्यापासून इथल्या नेटवर्क मध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. तरीही वी पोस्टपेड, प्रीपेड नेटवर्क संदर्भात कोणत्याही तक्रारी असल्यास, किंवा नवीन ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी फलटण तालुक्यातील एकमेव अधिकृत वी स्टोअर , ब्लड बँक समोर, स्टेट बँक मागे लक्ष्मीनगर, फलटण येथे भेट द्यावी तसेच गुगल मॅपवर सुद्धा पत्ता उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी मोबा 9371111977 संपर्क करावा, असे आवाहन वी स्टोअरचे  ओंकार शहा यांनी केले आहे


Back to top button
Don`t copy text!