फलटण शहरासाठी नवीन सब स्टेशन मंजूर; एका दिवसात रणजितसिंह यांची मागणी मुख्यमंत्री ना. फडणवीस यांच्याकडून मंजूर

माजी खासदार रणजितसिंह यांची मागणी एका दिवसात मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० डिसेंबर २०२४ | फलटण | फलटण शहराला विद्युत पुरवठा हा 132/33/22KV कोळकी या EHV महापारेषण उपकेंद्राच्या सहाय्याने होत असून महावितरण कंपनीचे कोणतेही स्वतंत्र उपकेंद्र फलटण शहरासाठी आजपर्यंत निर्माण केलेले नाही. यासाठी ते उपकेंद्र मंजूर करण्यात यावे; अशी मागणी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काल दि. ०९ डिसेंबर रोजी केली होती. ती मागणी आज म्हणजेच दि. १० डिसेंबर रोजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली असल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

फलटण शहर मध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण जास्त असून, कोठेही व कोणत्याही ठिकाणी फॉल्ट झालेस पूर्ण शहरामधील विद्युत पुरवठ्यावर परिणाम होत आहे व विद्युत पुरवठा बंद होतो. उदा. जिंतीनाका (उत्तर बाजूस) या ठिकाणी फॉल्ट झाला तर विमानतळ (पश्चिम बाजू), दक्षिण व पूर्व बाजूचा सुद्धा विद्युत पुरवठा खंडित होत आहे. जाधववाडी पासून ते पुढे जिंतीनाका पासून ते लोणंद रोड पर्यंतचा संपूर्ण भाग या 22KV फलटण फिडर वर पूर्णतः अवलंबून आहे. तसेच शहराचा पूर्व भाग हा 22KV YC फीडरवर अवलंबून आहे; अशी मागणी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली होती.

यासोबतच मागणी करताना माजी खासदार रणजितसिंह यांनी स्पष्ट केले आहे की; फलटण शहर मध्ये विद्युत जाळे HT/LT LINES खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. जर संपूर्ण शहरांतर्गत अंडरग्राउंड विद्युत वाहिनी (केबल) टाकलेस विद्युत पुरवठा खंडित होणार नाही व अपघातांचे प्रमाण पण कमी होईल व वाढत्या फलटण शहराचा विचार करता सदर बाब लवकरात लवकर अस्तित्वात येऊन कार्यान्वित होणे गरजेचे आहे.

फलटण शहरासाठी नविन उपकेंद्र व संपूर्ण फलटण शहरामध्ये अंडरग्राउंड केबल करण्याबाबत तात्काळ संबंधितास योग्य त्या सुचना देण्यात याव्यात. तसेच सदर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महावितरण मुख्य कार्यालय, प्रकाशगढ, मुंबई यांचेकडे बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असून या प्रस्तावास तत्काळ मंजूरी मिळून निधी उपलब्ध करून देण्याकामी विनंती केली होती त्यानुसार आज तातडीने मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मागणी एका दिवसातच मंजूर केली आहे.


Back to top button
Don`t copy text!