नियमाचे पालन आणि मास्कचा वापर अनिवार्य
स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 23 (वृत्तसंस्था) : टीव्ही आणि चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी केंद्र सरकारने विस्तृत अशा मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
या मार्गदर्शक सूचनांमुळे चित्रीकरणामधील कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी योग्य परिस्थिती निर्माण करण्यात मदत मिळेल, असे जावडेकर यांनी म्हटले आहे. या सूचनांमध्ये सर्व ठिकाणी फेस मास्कचा वापर आणि शारीरिक अंतर राखणे अनिवार्य करण्यात आले आहे. या सूचना कलाकारांवर मात्र लागू होणार नाहीत. या सूचनांनुसार सीटिंग, कॅटरिंग, क्रू पोझिशन्स, कॅमेरा लोकेशनमध्ये योग्य ते अंतर राखावे लागणार आहे. रेकॉर्डिंग स्टुडिओ, एडिटिंग रूममध्ये देखील शारीरिक अंतराचे पालन करावे लागणार आहे. सध्या सेट्सवर दर्शकांना जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
काय आहेत नव्या मार्गदर्शक सूचना?
कॅमेर्यासमोरील कलाकारांना सोडून सर्वांसाठी फेस कव्हर्स/मास्क अनिवार्य, प्रत्येक ठिकाणी 6 फुटांच्या अंतराचे पालन करावे, मेकअप आर्टिस्ट, हेयर स्टायलिस्ट्स पीपीईचा वापर करणार, विग, कॉस्ट्यूम आणि मेकअपची शेयपरिंग कमी करावी लागणार, शेयर करण्याजोग्या वस्तूंचा वापर करताना ग्लोव्हज घालावेत, माइकच्या डायफ्रामशी थेट संपर्क ठेवू नये, प्रॉप्सचा वापर कमीतकमी व्हावा, वापरानंतर सॅनिटायझेशन आवश्यक, चित्रीकरणावेळी कास्ट अँड क्रू कमीतकमी असावेत, शूट लोकेशनवर एंट्री/एग्झिटचे वेगवेगळे मार्ग असावेत, व्हिजिटर्स/ दर्शकांना सेटवर जाण्याची परवानगी नाही, कमीत कमी संपर्क असावा, हेच लक्ष्य.
एसओपी चित्रीकरणाची स्थाने आणि इतर कामाच्या ठिकाणी योग्य ते अंतर राखले जाणे अत्यंत आवश्यक आहे, असे केंद्रीय मंत्री जावडेकर म्हणाले. याबरोबरच योग्य स्वच्छता, गर्दीचे नियोजन आणि सुरक्षात्मक उपकरणांसाठी तरतुदींसह उपायांचा समावेश आहे. कमीत कमी संपर्क, एसओपीमध्ये मूलभूत आहे, असे ट्विट जावडेकर यांनी केले आहे. कमीतकमी शारीरिक संपर्क आणि हेयर स्टायलिस्टांद्वारे पीपीई, प्रॉप्स शेयर करणे आणि इतरांमध्ये मेकअप याबाबत कलाकारांद्वारे विशेष काळजी घेतली जाणार आहे.
प्रतिबंधात्मक उपाय
● संसर्गाची जोखीम अधिक असलेले ज्येष्ठ कर्मचारी, गर्भवती आणि आजारी कर्मचाऱ्यांनी जास्त काळजी घ्यावी. लोकांशी थेट संपर्क टाळावा
● कंपन्यांनी कार्यालयांची प्रवेशद्वारे आणि चित्रिकरणासारख्या* कार्यस्थळी सॅनिटायझरबरोबरच साबण आणि पाण्याची व्यवस्था करावी.
● कर्मचाऱ्यांनी साबण आणि पाण्याने वारंवार किमान ४०-६० सेकंद हात धुणे आवश्यक. कामाच्या ठिकाणी थुंकण्यास पूर्णपणे मज्जाव.
● चित्रिकरण स्थळे, ध्वनिमुद्रण स्टुडिओ आणि संकलन खोल्यांमध्ये बसताना, बोलताना एकमेकांपासून किमान सहा फूट अंतर राखणे आवश्यक.