
स्थैर्य, नवी दिल्ली, 27 : गोव्याच्या सीमेत प्रवेश करणाऱ्यांसाठी राज्य सरकारने काही नियम लागू केले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. कोरोनामुळे देशात अनेक बदल झाले आहे. यापुढेही या बदलांचा अवलंब करणे आवश्यक ठरणार आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, आम्ही कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट आवश्यक केलं आहे. येथे 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईनची सुविधा मिळणार नसल्याने तत्सम व्यक्तीला कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकेट आणावे लागेल. यासाठी अर्थात यासाठी त्या व्यक्तीला कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. याचा अर्थ गोव्याला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना टेस्ट करावी लागणार आहे.
गोव्यात पुन्हा समोर आले कोरोनाचे रुग्ण
गोव्याला एप्रिल महिन्यातच कोरोनामुक्त घोषित करण्यात आले होते. मात्र पुन्हा एकदा कोरोनाने गोव्यात दस्तक दिला आहे. गोव्यात भारतीय तटरक्षक दलाचे एक अधिकारी आणि एक अन्य महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. या नव्या प्रकरणांसह राज्यात एकूण 41 संक्रमितांवर उपचार सुरू आहे. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तटरक्षक दलाचे अधिकारी मुंबईहून गोव्याला आलेल्या 11 सदस्यीय दलाचा भाग होते.