
दैनिक स्थैर्य । 10 जुलै 2025 । फलटण । एमपीएससी परीक्षेत विविध पदावर निवड झाल्यानंतर अभ्यास दौर्यासाठी विविध अधिकार्यांनी ग्रामपंचायत कोळकी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी गावकर्यांशी संवाद साधला. या दरम्यान अधिकार्यांना याठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले.
संवाद साधण्यासाठी आलेले अधिकार्यांमध्ये तहसिलदार रेश्मा निकम, सहाय्यक राज्यकर आयुक्त सौ. वृषाली गोडे, पोलीस उपअधिक्षक दीपक शेलार, उपजिल्हाधिकारी पुरुषोत्तम कोकरे, सहाय्यक राज्यकर आयुक्त धीरज रमेश जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी रामेश्वर बेडके आदी अधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी कोळकीच्या सरपंच सौ. रेश्मा देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, सौ. प्राजक्ता काकडे, दिशा महिला ग्रामसंघ अध्यक्ष सौ. सुजाता नाळे, सौ. कोमल नाळे, सौ. हेमलता भोसले तसेच विविध बचतगटाचे सचिव उपस्थित होत्या. यावेळी भेट देणार्या अधिकार्यांनी बचत गटात काम करताना येणार्या अडचणी याविषयी संवाद साधला.