दिशा मृत्यू प्रकरणात नवीन दावा : त्या रात्री दिशावर झाला होता सामुहिक बलात्कार, आवाज बाहेर जाऊ नये म्हणून मोठ्या आवाजात लावली होती गाणी; प्रत्यक्षदर्शीचा खळबळजनक खुलासा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.१९: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी नवनवीन खुलासे होत आहेत. आता दिशा सालियान मृत्यूप्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. दिशाच्या मृत्यूच्या दिवशी पार्टीमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा खुलासा प्रत्यक्षदर्शीने ‘न्यूज नेशन’ या वृत्तवाहिनीकडे केला. त्या पार्टीमध्ये बॉलिवूडमधला एक स्टारसुद्धा उपस्थित होता, असेही त्याने सांगितले आहे.

प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार, ‘पार्टीमध्ये एकूण सहा जण उपस्थित होते. दिशाचा होणारा पती रोहन रॉयसुद्धा उपस्थित होता. चार जणांनी मिळून दिशावर बलात्कार केला. दिशाचा आवाज बाहेर ऐकू जाऊ नये म्हणून मोठ्या आवाजात गाणी लावली होती,’ अशी धक्कादायक माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे.

दिशाचा 8 जून रोजी मुंबईतील एका इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडल्यामुळे मृत्यू झाला होता. गेल्या महिन्यात दिशाच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी मृत्यूची चौकशी सुरू केली. दिशाबाबत अफवा पसरवल्या प्रकरणी त्यांनी मालवणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. दिशाच्या मृत्यूनंतर एका आठवड्यानंतर 14 जून रोजी सुशांतचा मुंबईतील त्याच्या राहत्या घरी मृतदेह आढळला होता.

दिशाचा होणा-या नव-याने घटनास्थळावरुन पळ काढला होता

प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार, दिशाचा मृतदेह पाहून रोहन रॉय आणि त्याच्या मित्राने वांद्रे रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली होती आणि ट्रेन पकडून घरी निघून गेले होते. पोलिस रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासू शकतात, असेही त्याने म्हटले.

सुशांतला शोधून काढायचे होते सत्य

दिशाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर सुशांत बेशुद्ध झाल्याचे त्याचा रुममेट सिद्धार्थ पिठानीने सीबीआयला दिलेल्या जबाबात सांगितले आहे. दिशासोबत नेमके काय घडले हे सुशांतला जाणून घ्यायचे होते. तिच्या मृत्यूने त्याला मोठा धक्का बसला होता. त्याने आपल्या मित्राला फोन करुन दिशाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला होता, अशी माहितीदेखील समोर आली आहे


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!