
स्थैर्य, फलटण, दि. १६ सप्टेंबर : फलटण नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झालेले निखिल जाधव यांनी आज आपला पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी नगरपरिषदेच्या सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला.
या आढावा बैठकीमध्ये, “सर्वसामान्य नागरिकांची कामे कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी,” असे स्पष्ट निर्देश नूतन मुख्याधिकारी जाधव यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. कामाचा निपटारा जलद गतीने आणि पारदर्शकपणे करण्यावर आपला भर असेल, असे संकेत त्यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत दिले आहेत.