दैनिक स्थैर्य । दि. 30 जून 2021 । फलटण । फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी प्राथमिक विद्यामंदीरात सन 2021 – 22 या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात करण्यात आली.
यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती निर्मला रणवरे या 29 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर प्रशालेचे नूतन मुख्याध्यापक रुपेश शिंदे यांचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्यावतीने स्वागत करुन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक रुपेश शिंदे यांनी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये ऑनलाईन तासांचे नियोजन, माझे मुलं माझी जबाबदारी उपक्रम, इ. 1 ली प्रवेश प्रक्रिया, नवागतांचे स्वागत, वर्ग सजावट आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. व्हाटस्अॅप, यु ट्यूब, गुगल फॉर्म, फेसबुक, टेलीग्राम या समाजमाध्यमांचा शिक्षणासाठी कसा उपयोग करायचा हे सांगताना, ‘‘शिक्षकांनी आपले ज्ञान अद्यवात ठेवणे, ते वृद्धींगत करणे गरजेचे असल्याचे सांगून त्यासाठी शिक्षकांनी संगणकाचे सर्वतोपरी ज्ञान आत्मसात करावे. ज्ञानरचनावादी शिक्षण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुलांसाठी विविध उपक्रम, स्पर्धा राबवाव्यात. विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्त्व विकास हेच प्रशालेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्व शिक्षकांनी कार्यरत राहावे’’, असे रुपेश शिंदे यांनी सांगितले.
नवनिर्वाचित शिक्षक प्रतिनिधी पाडवी यांनी सूत्रसंचालन केले.