
दैनिक स्थैर्य । 16 एप्रिल 2025। फलटण । महादेव नगर कोळकी येथे नियमित वीजपुरवठा होण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी येत होती. याठिकाणी अनेकवेळा वीजपुरवठा खंडीत होत होता.
आमदार सचिन पाटील यांनी उमेश गार्डी यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्यावेळी विजेच्या समस्यांनी नागरिक हैराण झाले असल्याची तक्रार आ. सचिन पाटील यांच्याकडे किरण जाधव, रवि सुतार, उमेश यांनी महादेव नगर, दडिले वस्ती, शेंडे मळा, येथील रहिवाशांनी तक्रार केली होती.
रहिवाशांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन आमदार सचिन पाटील यांनी कार्यकारी अभियंता यांना दूरध्वनीवरून सुचना केल्या. त्यानुसार महावितरणतर्फे याठिकाणी नवीन 200 केव्हीचा डिपी बसविण्यात आला. वीजेची समस्या सुटण्यास मदत झाल्यामुळे येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाली. याबद्दल महादेवनगर ग्रामस्थांनी आमदार सचिन पाटील यांना धन्यवाद दिले आहे.