नेहरू युवा केंद्राचा पुणे जिल्हास्तरीय युवा उत्सव २०२३ कार्यक्रम उत्साहात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ जून २०२३ । पुणे । नेहरू युवा केंद्र पुणे व डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हास्तरीय युवा उत्सव २०२३ कार्यक्रम डेक्कन कॉलेजच्या आवारात उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार श्री सिद्धार्थ शिरोळे ,डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद पांडेय,नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक श्री यशवंत मानखेडकर ,राष्ट्रीय सेवा योजना चे क्षेत्रीय संचालक डी.कार्थिकेयन ,डेक्कन अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.प्रसाद जोशी ,डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव प्रा.अभिजीत दांडेकर ,पुणे मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन उपयुक्त आशा राऊत,पुणे मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ.केतकी घाटगे ,कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष श्रो चंद्रकांत शहासने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वालालने झाली.
प्रास्ताविकपर भाषणात बोलताना नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक श्री यशवंत मानखेडकर म्हणाले ,”देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात भारताच्या युवाशक्तीमध्ये असलेल्या कला गुणांना वाव देण्यासाठी अमृतकाल के पंच-प्रण या मुख्य विषयावर आधारित विविध ५ प्रकारच्या स्पर्धा या युवा उत्सवाद्वारे घेण्यात येणार आहेत.या युवा उत्सवातून युवकांनी स्वतःमधील कलागुणांना  समोर आणले पाहिजे.यासाठीची संधी नेहरू युवा केंद्र युवा उत्सवाद्वारे  युवकांना उपलब्ध करून देत आहे.”
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेल्या आमदार श्री सिद्धार्थ शिरोळे यावेळी म्हणाले,”युवा  उत्सवसारख्या कार्यक्रमातून युवकांनी कलागुणांद्वारे व्यक्त होणे गरजेचे आहे.युवकांनी नवनवीन संकल्पना व आपल्यातील कला कौशल्य आणि सुप्त गुणांना याद्वारे वाव देऊन देशाला समृद्ध बनवायला हवे.अशा युवकांना  नेहरू युवा केंद्र मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. त्याचा पुरेपूर वापर युवकांनी करून घेतला पाहिजे.”
अध्यक्षीय भाषणात बोलताना डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद पांडेय म्हणाले ,”२०० वर्षे जुनी परंपरा असलेले डेक्कन अभिमत विद्यापीठ आजही जगभरात आपला नावलौकिक टिकवून आहे ही देशासाठी अभिमानास्पद बाब आहे.डेक्कन अभिमत विद्यापीठ आजही देशाच्या एकता व एकजुटीचे दर्शन घडविते आहे.त्यामुळे नेहरू युवा केंद्र व डेक्कन अभिमत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेला युवा उत्सव सारखा कार्यक्रम युवकांना निश्चितच कलागुणांना वाव देणारा आहे .”
युवा उत्सव २०२३ कार्यक्रमात भाषण, कविता, वाचन, चित्रकला, नृत्य व फोटोग्राफी अशा विविध ५  स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते,या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.यावेळी पुणे जिल्ह्यांतील बचत गट ,विविध संस्थांच्या कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन व  कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे अमृत महोत्सवानिमित्त १०००० क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले व आभारप्रदर्शन नेहरू युवा केंद्र चे कार्यक्रम व लेख पर्यवेक्षक श्री सिद्धार्थ चव्हाण यांनी केले.

Back to top button
Don`t copy text!