स्थैर्य, मुंबई, दि. १४: जगभरात कोरोना विषाणूग्रस्तांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत असल्याने कच्चे तेल व बेस मेटलच्या किंमती झाल्या तर पिवळ्या धातूची मागणी वाढली. अमेरिकेतील घटता क्रूडसाठा आणि सौदी अरेबियात अतिरिक्त उत्पादन कपातीमुळे क्रूडच्या किंमतीत घसरण झाली. अमेरिकी डॉलर मजबूत स्थितीत आल्याने औद्योगिक धातूंवर दबाव आला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
कच्चे तेल: जागतिक पातळीवरील मागणीवर दबाव असल्याने तेलाच्या किंमतीवर परिणाम झाला. त्यामुळे डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ०.६% नी घसरले व ते ५२.९ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या ताज्या रिपोर्टनुसार, अमेरिकी क्रूड साठ्यात ३.२ दशलक्ष बॅरल्सची घट झाली. तेलाचा प्रमुख उत्पादन सौदी अरेबियाने फेब्रुवारी २०२० व मार्च २०२० साथीमुळे कोलमडलेल्या स्थितीत अतिरिक्त उत्पादन दररोज एक दशलक्ष बॅरल या प्रमाणात कपात करण्याची घोषणा केली. यामुळे कच्च्या तेलाला काहीसा आधार मिळाला.
तथापि, कोव्हिड-१९ संसर्गाच्या चिंताजनक वाढीमुळे तसेच ब्रिटन, चीन आणि जर्मनीसह काही प्रमुख अर्थव्यवस्थांवर निर्बंध लादल्याने कच्च्या तेलाच्या मागणीवर परिणाम झाला व किंमतीही घसरल्या. साथीच्या वाढत्या प्रभावामुळे क्रूडचे दर आणखी काही प्रमाणात घटण्याची शक्यता आहे.
बेस मेटल्स: कोरोना विषाणू संसर्गात प्रचंड वाढ झाल्याने एलएमई वरील बेस मेटलचे दर लाल रंगात स्थिरावले. अमेरिकी डॉलर मजबूत झाल्याने धातूंचे दर आणखी घटले. तथापि, अतिरिक्त प्रोत्साहन आणि जागतिक मध्यवर्ती बँकांकडून साथीचे परिणाम नियंत्रित करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे औद्योगिक धातूंच्या किंमतीतील तोटा मर्यादित राहिला.
पर्यावरणाच्या चिंतेमुळे फिलिपाइन्समधील खाणीवरील निर्बंध आणि न्यू कॅलेडोनियामध्ये झालेल्या निदर्शनामुळे निकेलच्या पुरवठ्याची चिंता वाढली. तसेच किंमती आणखी वाढल्या. धातूचा सर्वात मोेठा ग्राहक असलेल्या चीनने कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ नोंदवली. त्यामुळे काही क्षेत्रात लॉकडाऊन झाले असून औद्योगिक धातूंच्या किंमतींवर त्याचा नकारात्मक परिणाम झाला.
सोने: स्पॉट गोल्ड ०.७% नी कमी झाला तर १,८४३.४ डॉलर प्रति औसांवर स्थिरावला. अतिरिक्त प्रोत्साहन मदत मिळवण्यावर बेट्स लागल्याने अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढले. त्यामुळे अमेरिकी डॉलरचे मूल्य वाढले. तथापि, अमेरिकी डॉलर मजबूत झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेल्या सोन्याची मागणी इतर चलनधारकांमध्ये वाढली.
राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या प्रशासनाकडून अमेरिकी अर्थव्यवस्था पुनर्जीवित करण्याकरिता महत्त्वपूर्ण मदतीची अपेक्षा केली जात आहे. याउलट, अतिरिक्त मदतीमुळे चलनवाढीचे संकट येऊन पिवळ्या धातूच्या किंमतीत घट होण्याची शक्यता दिसून येत आहे. बहुतांश गुंतवणूकदार सोन्याकडे वळाले. चलन दरवाढ आणि महागाईच्या काळात सोने हेच प्रभावी ठरू शकते, असे मानले जाते. यासोबतच, बिकट जागतिक आर्थिक स्थिती आणि नव्या विषाणूच्या स्ट्रेनमुळे वाढलेली चिंता यामुळे सोन्याची मागणी वाढली.