नीरा देवघर प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन कामाला गती द्या : उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस; खासदार रणजितसिंह यांच्या प्रयत्नांना यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३१ जानेवारी २०२३ । फलटण । फलटण व माळशिरस तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला नीरा – देवधर प्रकल्पला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात अली आहे. त्यासोबतच राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या कृष्णा – भीमा स्थिरीकरण योजनेतील अडचणी दूर करण्याबाबत जलसंपदा विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. फलटण – पंढरपूर रेल्वेच्या डीपीआरला मान्यता देण्यात आली आहे. फलटण तालुक्यातून विद्युत रोहित्र चोरी जात असल्याचे प्रकार गंभीर असून या संदर्भात कडक कारवाई करण्याच्या पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विविध मागण्यांना तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित जलसिंचन व इतर विषयांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज सकाळी बैठक झाली. खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, शहाजीबापू पाटील आणि जलसंपदा, ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

निरा देवधरच्या कालव्याच्या पाण्यासंदर्भात मागील माहायुती सरकारने घेतलेल्या निर्णय आज भाजप शिवसेना सरकारने रद्द करत पुन्हा सुधारित मान्यता दिली. येणाऱ्या काळात कॅनॉलचे काम पूर्ण करून फलटण, माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर केला आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मागील महायुती सरकारने वळवून बारामतीला नेहले होते संबंधित शेतकऱ्यांवर अन्याय केला होता. माजी खासदार लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे स्वप्न माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पूर्ण केल्याने फलटण शहरासह तालुक्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष करण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी हा अन्याय दूर करण्यासाठी माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी सुरू केलेल्या संघर्ष पुढे त्याच्या पश्चात त्याचे पुत्र माढ्याचे तडफदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुढे नेऊन वेळोवेळी पाठपुरावा करत हा प्रश्न तडीस नेला आहे. फलटण व माळशिरस भागातील शेतकऱ्यांसाठी निरा देवघर धरणातील पाणी साठ्या पैकी ११.७३ पाणी साठा उपलब्ध होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना सरकारने हे सूत्र बदलून निरा डाव्या कालव्यातून बारामती भागाला ६० टक्के व उर्वरित फलटण माळशिरस भागाला निरा डाव्या कालव्यातून ४० टक्के पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला स्थगिती देत आज राज्य शासनाने उर्वरित काम पूर्ण करून लवकरात लवकर लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाचे स्वागत फलटण तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी फलटण शहरात चौका चौकात व ग्रामीण भागात प्रत्येक लाभ क्षेत्रातील गावात फटाकड्यांची आतिशबाजी करत माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा जयघोष केला. फलटण तालुक्यातील ५६ गावे तर माळशिरस तालुक्यातील २० गावे ओलिताखाली येणार आहेत.

दरम्यान यावेळी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णा – भीमा स्थिरीकरण योजनेतील अडचणी दूर करा. सांगोला उपसा जलसिंचन योजनेचे काम निर्धारीत वेळेत पूर्ण करा. फलटण-पंढरपूर रेल्वे डीपीआरला मान्यता फलटण तालुक्यातून विद्युत रोहित्र चोरी जात असल्याचे प्रकार गंभीर असून या संदर्भात कडक कारवाई करण्याच्या पोलिसांना निर्देश कुकडी लाभक्षेत्रात येणाऱ्या करमाळा उत्तर भागातील गावांना पाणी पोहोचविण्याचे काम पूर्ण करा असे निर्देश यावेळी दिले.


Back to top button
Don`t copy text!