मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून नीरा – देवघरचा प्रश्न सोडवणार : पालकमंत्री ना. शंभूराज देसाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ जानेवारी २०२३ । फलटण । आपण आमदार, मंत्री आहोत ते सामान्य शिवसैनिकांनी आपल्या पाठीशी ताकद उभी केली म्हणुन त्यामुळे पदावर आल्यानंतर त्यांना विसरु नका अशी मुख्यमंत्र्यांची आम्हाला शिकवण आहे. मी पालकमंत्री आसे पर्यंत विकासकामांबाबत दुजाभाव होणार नाही. प्रत्येक तालुक्यास निधी वाटपाचा समतोल राखण्याचा प्रयत्न पालकमंत्री म्हणुन आपण केला आहे असे स्पष्ट करुन देसाई म्हणाले, झिरपवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रलंबित विषय आहे, त्याबाबत लवकरच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व संबंधित सर्व अधिकारी यांची बेठक लावू, जिल्हास्तरावर निधी देवून हा प्रश्न सुटणार असेल तर तो देवू परंतू निधी कमी पडला तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यामार्फत आवश्यक निधी आणुन हा प्रश्न मार्गी लावू अशी पालकमंत्री म्हणुन आपण अश्वासन देतो. गेल्या साडेपाच महिन्यात सरकारने अठरा प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली आहे. गेल्या अडिच वर्षात हीच संख्या केवळ एक होती यावरुन या सरकारची कार्यतत्परता दिसून येत असल्याचे सांगत नीरा – देवघरच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करुन हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त फलटण येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचा व आरोग्य शिबीराचा शुभारंभ मंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जेष्ठ नेते प्रल्हादराव साळूंखे-पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, जयवंत शेलार, जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, ॲड. नरसिंह निकम, विश्वासराव भोसले, महिला आघाडी जिल्हा प्रमुख शारदा जाधव, समशेरसिंह नाईक निंबाळकर, पिंटू इवरे, अशोकराव जाधव, विराज खराडे, विजय मायणे, सचिन बिडवे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

सातारा जिल्ह्यातील जलसंपदाचे व पर्यटनाबाबतचे प्रकल्प, पुनर्वसनाचा विषय तसेच रस्ते, पुल अशा अन्य महत्वपुर्ण विषय व प्रश्नांसदर्भातील जिल्ह्याचा आराखडा तयार करुन त्यास जो निधी लागेल त्याबाबतची तरतूद अगामी अर्थसंकल्पात करण्यासाठी तसा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. बाळासाहेबांची शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने वाटचाल करीत आहे असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.

झिरपवाडी ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न महत्वाचा आहे. तांत्रिक गुंता करुन ती इमारत खाजगी संस्थेला येथील काही लोकप्रतिनिधींना द्यायची आहे. याबाबत त्यांची मंत्रालयात बैठकही झाली आहे. त्यामुळे जनतेला मोफत आरोग्य सुविधा देणारे रुग्णालय होवू द्यायचे नाही हे यामागचं राजकारण आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटणे सर्वसामान्य जनतेसाठी महत्वाचे आहे. तालुक्यातील अगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालीका निवडणूका भाजप बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या हातात हात घालुन लढेल अशी ग्वाही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली.


Back to top button
Don`t copy text!