वैचारिक खोली व विशुद्धता हवी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


माणसाला काय हवे? असे विचारल्यास आपण सगळंच हवे.असे म्हणार. पण ते इतरांसठी उपयोगी पडेल का? नाही तरी तलाव हा विहीरी पेक्षा शेकडो पट मोठा असूनही लोकं विहीरीचच पाणी पितात. कारण विहीर खोल असून पाणी शुद्ध असते. माणूस मोठा असणे ही चांगली गोष्ट आहे पण त्याच्या व्यक्तिमत्त्वात सखोलता आणि विचारात शुध्दता असेल तर तो महान बनतो.नुसतं मोठे असून चालत नाही.तर आपले मोठेपण सिद्ध करावे लागते.वैचारिक शुद्धता असल्यास काहीच कमी पडणार नाही.

विचार मोठे असणं तर गरजेचं आहे.पण त्या वैचारिक मोठेपणात सखोलता,शुद्धता,विश्वासार्हता या त्रिगुणाचा मिलाफ असावा.आपली वैचारिक बैठक खुजी,बुरसटलेली,मतलबी,ढोंगी,सोंगी,वेळपरत्वे बदलणारी नसावी.ती त्रिकाळबाधित एकच असावी.आपल्या विशाल वैचारिक भूमिकेत आजचा विचार नसून भविष्यकालीन वैचारिक अधिष्ठान असावे.

आपण नसतानाही आपले विचार जगले पाहिजेत.आज आपणा शरीरानेच जगतो आहोत.वैचारिक जगणं शोधावं लागतं.विचारात नितीमत्ता,सात्त्विकता,धैर्य,तेजस्वीतता,निर्भीडपणाची जोड असल्यास कोणतीच अडचण येणार नाही.वैचारिक गोंधळ ,धरसोडपणा,चलावू वृत्ती याने शुद्धता कमी होती.प्रसंगी सत्वपरीक्षा द्यावी लागली तरी आपण आपल्या विचारांशी ठाम असावे.वैचारिक श्रीमंतीचे भंडार खुले करून सर्वांना लुटू द्यावे .तेव्हढेच नव्हे तर काकंणभर जादाच सापडले.

वैचारिक श्रीमंत होण्यासाठी काही पथ्ये पाळावीच लागतील.सकारात्मकता, सात्त्विकपणा, विशाल दृष्टिकोन , सुसंस्कारीतपणा, सखोल वाचन अन् श्रवण ,संयमीपणा,चित्ताची शुद्धता या पथ्याने आपण योग्य पथावर वाटचाल करु.वैचारिक श्रीमंती भपकेपणा, मीपणा यात टिकत नाही.आपल्याकडील वैचारिक धनाला सुरक्षित ठेवण्याची ,चोराची भिती नाही.जेवढी वैचारिकता वाढेल तेवढी सुरक्षितता लाभेल.मग धन , संतान, संसार यापुढे फिका पडणार. वैचारिक वारसा पुढील पिढीकडे देताना कटकट तंटा वैताग हे लुप्त होऊन सा-यांचे चेहेरे प्रफुल्लित असणार.आपण फक्त वैचारिक साठा वाढवूया व वाटू या. विहीरच पाणी जेवढे उपसले जाईल तेवढे शुद्ध वैचारिक झरे सुरु होऊन विचारसाठा वाढेल.मग काय ठरलं ना…. वैचारिक श्रीमंत होऊ या.

आपलाच वैचारिक ​– प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!