दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑक्टोबर २०२२ । बिबी । हल्लीच्या धकाधकीच्या काळात कोणाला कधीही काहीही होउ शकते. कोणताही आजार अचानक उद्भवू शकतो. अशा काळात मेडिक्लेम पॉलिसी असेल तर आर्थिक बोजा फारसा पडत नाही. यासाठी मेडिक्लेम पॉलीसी गरजेचे असल्याचे प्रतिपादन रोहित सुनिल बोबडे यांनी केले. बिबी, ता. फलटण येथील युवराज चव्हाण यांना मेडिक्लेम पॉलीसीचा धनादेश वितरणप्रसंगी बोलत होते.
याबाबतची हकीकत अशी, युवराज चव्हाण हे रात्री 11 च्या सुमारास मोरगाव वरून आपल्या गावी चव्हाणवाडी ला येत असताना त्यांच्या अचानक छातीमध्ये दुखू लागलं त्यांना काही करावे कळेना तेथील गावातील काही लोकांनी त्यांना शेजारच्या मोरया हॉस्पिटल मोरगाव येथे दाखल करण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांना बोलवायला सांगितले नातेवाईक आल्या नंतर त्यांना कळवण्यात आले की यांना अचानक हार्टअटॅक चा झटका आला आहे. या कारणामुळे डॉक्टरांनी युवराज चव्हाण यांना तीन दिवस ऍडमिट करून घेतलं. त्यानंतर सर्व शस्त्रक्रिया झाल्या नंतरडॉक्टरांनी त्यांना सांगितले की त्यांची अँजियोप्लास्टी करावी लागेल यासाठी त्यांना गिरीराज हॉस्पिटल बारामती येथे दाखल करण्यात आलं, तिथं त्यांची अँजियोप्लास्टी करण्यात आली. बारामती येथे त्यांना एन्जॉब्लास्टीसाठी 2 लाख 70 हजार रुपये एवढा खर्च झाला. तसेच मोरगाव मधील मोरया हॉस्पिटल चा खर्च 67 हजार रुपये एवढा झाला, या दोन्ही हॉस्पिटलचा खर्च मिळून 3 लाख 37 हजार रुपये एवढा झाला. हे सर्व झाले असता त्यांनी आपला स्टार हेल्थ कंपनीचा मेडिक्लेम इन्शुरन्स सप्टेंबर 2021 मध्ये घेतला होता, त्यांच्या या पॉलिसीला एक वर्ष देखील पूर्ण नाही झाले तरी कंपनीकडून त्यांना 337000 रुपये रकमेचा चेक देण्यात आला.
यावेळी युवराज चव्हाण व त्यांच्या गावातील ग्रामस्थांनी स्टार हेल्थ कंपनीचे व विमा प्रतिनिधी रोहित सुनील बोबडे यांचे आभार मानले.
जर कोणाला नवीन मेडिक्लेम इन्शुरन्स करायचा असेल तर 9503566820 या क्रमांकावर संपर्क साधावा असे रोहित सुनिल बोबडे यांनी सांगितले