दैनिक स्थैर्य | दि. २० ऑक्टोबर २०२१ | खंडाळा | संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. अद्यापपर्यंत खंडाळा, शिरवळ, बावडा व भादे गटाची मतमोजणी सुरु असून या चारही गटात राष्ट्रवादीने आघाडी मारली आहे. ज्येष्ठ नेते व कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष शंकरराव गाढवे व त्यांचे चिरंजीव व विद्यमान संचालक अनिरुद्ध गाढवे या बापलेकांसह इतरांना पराभवाची चव चाखावी लागली आहे.
खंडाळा कारखान्याची उभारणी करताना शंकराव गाढवे यांचे योगदान पाहता गाढवे गटाला हा पराभव जिव्हारी लागणारा आहे. तर सध्या इतर दोन गटांची मोजणी सुरू असून मतमोजणी सुरू एकूणच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. तर निवडणुकीच्या मतमोजणीच्या ठिकाणी गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला. तर खंडाळा, शिरवळ व बावडा गटातील विजय झालेल्या उमेदवारांनी आपापल्या गावी जाऊन गुलालाची उधळण करून जल्लोष केला.
दरम्यान, आमदार मकरंद पाटील हे सुध्दा येथे दाखल झाल्याने कार्यकत्यांनी एकच जल्लोष केला. अद्यापपर्यंत निकालात : संस्था व बिगर उत्पादक गटामध्ये गजानन धुमाळ यांना 826 तर अनिरुध्द गाढवे यांना 369 मते मिळाली आहेत. यामुळे राष्ट्रवादीचे गजानन धुमाळ 457 मतांनी विजयी झाले. एकुण 12 मते बाद ठरली. तर खंडाळा गटात संस्थापक पॅनेलचे प्रमुख शंकरराव गाढवे यांना 2543, अशोक गाढवे 3358, रविंद्र ढमाळ 2144, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्ताञय ढमाळ 3445), चंद्रकांत ढमाळ 3390 अशोक ढमाळ 2224 तर अपक्ष संतोष देशमुख 77 अशी मते मिळाली आहेत. येथे परिवर्तन पॅनेलचे दत्ताञय ढमाळ, अशोक,गाढवे व चंद्रकांत ढमाळ विजयी झाले.
सहकारातील चुकीच्या प्रवृत्तींवर कारवाई करा : अजित पवार
तसेच शिरवळ गटातून अधिकृत मते : नितीनकुमार भरगुडे पाटील 3532, विष्णु तळेकर 3426, राजेंद्र तांबे 3518, साहेबराव मंहागरे 2333, संजय पानसरे पानसरे 2254, चंद्रकांत यादव 2190, बाद मते 603. आमदारकीच्या निवडणुकीनंतर साडेचार वर्षांनी आमदार मकरंद पाटील व नितीन भरगुडे पाटील पुन्हा एकदा एकत्र आल्याची चर्चा रंगली आहे. या दोन्हीही नेत्यांनी एकत्र खांद्याला खांदा लावल्याने या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरला आहे.