
दैनिक स्थैर्य । दि.११ फेब्रुवारी २०२१ । दहिवडी । दहिवडीच्या नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून नगराध्यक्षपदी कै. वाघोजीराव पोळ यांचे नातू राष्ट्रवादीचे सागर पोळ तर उपनगराध्यक्षपदी राजेंद्र सांळुखे यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर गुलालाची उधळण व फटाक्याची आतीषबाजीने दहिवडी शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
काल भाजप व शिवसेनेने नगराध्यक्षापदाचे अर्ज माघारी घेतल्यानंतर सागर पोळ यांची बिनविरोध निवड निश्चित होती. आज त्यांची औपचारीकता पुर्ण झाली. सकाळी पीठासीन अधिकारी प्रांतआधिकारी शैलेश सुर्यवंशी मुख्याधिकारी अवधुत कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रकिया सुरु झाली.
यावेळी नुतन नगराध्यक्ष सागर पोळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र सांळुखे निलीमा पोळ, विशाल पोळ, सुरेंद्र मोरे, मोनिका गुंडगे, वर्षाराणी सावंत, सुप्रीया जाधव, महेश जाधव, विजया जाधव, शैलेंद्र खरात उपस्थित होते.
निवड प्रक्रीया सुरु होताच उपनगराध्यक्ष पदासाठी राजेंद्र सांळुखे यांनी अर्ज दाखल केला. दुपारी १२ वाजता विरोधात कोणाचाही अर्ज दाखल न झाल्याने सुरुवातीला नगराध्यक्षपदी सागर पोळ तर उपनगराध्यक्ष पदी राजेंद्र सांळुखे बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. त्यानंतर नुतन अध्यक्ष उपाध्यक्ष व नगरसेवक यांचे माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख पीठासन अधिकारी शैलेश सुर्यवंशी मुख्याधिकारी अवधुत कुंभार यांनी अभिनंदन केले. त्यानंतर दहिवडी शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख सरचिटणीस अभय जगताप युवकचे तालुका अध्यक्ष विक्रम शिंगाडे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, सुनिल पोळ, बाबा पवार, तानाजी मगर, दादासाहेब चोपडे, बाळासो गुंडगे, तानाजी जाधव, दादा जाधव, रामभाऊ पोळ, शामराव नाळे, पतंगराव जाधव, लालासो ढवाण, संजय जाधव, शामराव पोळ,महेश कदम उपस्थित होते.
पोळ घराण्याची राजकीय परंपरा कायम
दहिवडीत अनेकांना सरपंच करणारे कै.वाघोजीराव पोळ उपसरपंच होते त्या नंतर त्यांच्या स्नुषा विद्यमान नगरसेविका निलीमा पोळ यांनी दहिवडीचे सरपंच पद जिल्हा परीषद सदस्य म्हणून काम पाहीले होते तर प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नातू सागर पोळ यांनी थेट नगराध्यक्ष पद देत पोळ घराण्याची राजकीय परंपरा कायम ठेवली.