स्थैर्य, कोळकी दि.३: कोळकी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजेच ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली गावची सत्ता अबाधित राहणार असून कोळकी ग्रामपंचायतीवर पुन्हा राष्ट्रवादीचाच झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास, कोळकी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व जेष्ठ नेते दत्तोपंत शिंदे यांनी व्यक्त केला.
फलटण शहराच्या शेजारी असलेले मोठे उपनगर म्हणूनच कोळकी गावाची ओळख आहे. मागील काळामध्ये कोळकी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावामध्ये जेष्ठ नागरिक तसेच महिलांना फिरता यावे यासाठी उद्यान, संपूर्ण कोळकी गावांमध्ये बंदिस्त गटार योजना व रस्त्याचे काँक्रिटीकरण यासोबतच वीज वितरणासाठी लागणारे विद्युत खांब व रस्ते डांबरीकरण आदी विकास कामे करण्यात आलेली आहेत. कोळकीमध्ये ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचीच सत्ता आहे. यंदाही ग्रामस्थ आपला कौल राष्ट्रवादीच्याच बाजूने देतील, असेही दत्तोपंत शिंदे यांनी स्पष्ट केले.