राष्ट्रवादीची महाराष्ट्र गौरव रथयात्रा आज फलटणमध्ये; मंत्री ना. मकरंद पाटलांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती : श्रीमंत शिवरुपराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 27 एप्रिल 2025। फलटण । राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते मोठया उत्साहात आज पार पडला होता. सदरील रथयात्रा हि आज फलटणमध्ये सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी येणार आहे. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांच्यासह प्रदेश राष्ट्रवादीचे प्रतिनिधी विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. तरी फलटणच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फलटण तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी केले आहे.

संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला ६५ वर्ष पूर्ण होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपूर्ण राज्यात महाराष्ट्र महोत्सव साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, या पाच विभागातून मुंबईत होणार्‍या महाराष्ट्र महोत्सवासाठी महाराष्ट्रातील हुतात्मा स्मारक, मंदिरे, दर्गा, गुरुद्वारा, तिर्थस्थळे याठिकाणची पवित्र माती, याशिवाय नद्यांचे जल आणि गडकिल्ल्यांची माती आणली जाणार आहे. त्यासाठीच्या रथयात्रेचा शुभारंभ आज प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

या महाराष्ट्र गौरव रथयात्रेच्या शुभारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री संजय बनसोडे, कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, मुंबई महिला अध्यक्षा आरती साळवी, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टच्या सदस्या मनिषा तुपे, मुंबई युवक अध्यक्ष सुनिल गिरी, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे सदस्य सुदर्शन सांगळे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!