कराडमध्ये राष्ट्रवादीचा वर्धापनदिन रक्तदान शिबिराने साजरा


रक्तदान शिबिरप्रसंगी ना. बाळासाहेब पाटील, मानसिंगराव जगदाळे, प्रणव ताटे, जशराज पाटील, देवराज पाटील व मान्यवर.

स्थैर्य, कराड, दि. 10 : राष्ट्रवादी काँग्रेसचा 21 वा वर्धापनदिन येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात रक्तदान शिबिराने पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कराड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्यावतीने सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक, युवा नेते जशराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचा शुभारंभ सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते आणि खा. श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

कोरोना महामारीत रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवू नये या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार व महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कराड उत्तर व कराड दक्षिण यांच्यावतीने रक्तदान शिबिर पार पडले.

यावेळी 297 जणांनी रक्तदान केले. यावेळी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, प्रकाशराव पाटील, रमेश चव्हाण, युवक काँग्रेसचे पोपटराव साळुंखे, अ‍ॅड. मानसिंगराव पाटील, नंदकुमार बटाणे, राजेश पाटील-वाठारकर, कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाषराव पाटील, सागर पाटील, कराड नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, धामणेरचे आदर्श सरपंच शहाजीराव क्षीरसागर व राष्ट्रवादी महिला आघाडी तसेच सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!