दैनिक स्थैर्य । दि. ०१ जुलै २०२२ । मुंबई । नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पीपल (एनसीपीईडीपी) या भारतातील आघाडीच्या अपंग व्यक्तींच्या हक्कांवर आधारित पुरस्कर्त्या संस्थेला अपंगत्व असलेल्या लोकांसाठी साध्यता आणि युनिव्हर्सल डिझाइन या क्षेत्रातील नेतृत्वाची ओळख पटवून देणाऱ्या एनसीपीईडीपी- एम्फसिस युनिव्हर्सल डिझाइन अवॉर्डस् २०२२ च्या १३व्या आवृत्तीची घोषणा करताना खूप अभिमान वाटतो आहे.
एनसीपीईडीपीने कायमच समावेशाचा पाया साध्यता असल्याच्या बाबीवर विश्वास ठेवला आहे. या दृष्टीकोनातून या पुरस्कारांची घोषणा २०१० साली एम्फसिसच्या (Mphasis) सहयोगाने सर्वांसाठी साध्यतेच्या सर्वोत्तम कार्यपद्धतींचे मानक ठरवण्यासाठी, परवडणे, साध्यता आणि व्याप्ती यांच्यावर भर देऊन स्थानिक उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी केली गेली होती. दरवर्षी हा पुरस्कार शिक्षण, व्यवसाय, पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रांमध्ये समावेशाची उपाययोजना किंवा वैश्विक डिझाइन तयार करून अपंगांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्नशील व्यक्ती आणि संस्थांना दिला जातो.
एनसीपीईडीपीचे कार्यकारी संचालक अरमान अली म्हणाले की, “समावेशकता म्हणजे अपंगत्व नसलेल्या व्यक्तीला ज्या प्रकारे तीच उत्पादने आणि सेवांचा वापर करता येतो, तशाच प्रभावशाली आणि एकात्मिक पद्धतीने त्याच संवादांमध्ये सहभागी होता येणे होय. परंतु आपल्या यंत्रणांच्या साध्य नसण्याच्या स्वरूपामुळे साध्यतेवर परिणाम होतो आणि अपंगत्व असलेल्या व्यक्तींचा समावेश करणे कठीण होते.
एनसीपीईडीपी- एम्फसिस युनिव्हर्सल डिझाइन नामांकने आता २०२२ साठी खुली आहेत. या पुरस्कारांमधून बांधीव वातावरण, वाहतूक, माहिती आणि जनसंपर्क तंत्रज्ञान (आयसीटी), सेवा, एड्स आणि अप्लायन्सेस, पुरस्कार आणि सार्वजनिक धोरण आदी क्षेत्रांमध्ये साध्यतेचा विचार करण्यात आला आहेः
२०२२ हे वर्ष पुरस्कारांचे १३ वे वर्ष असून खालील चार क्षेत्रांमध्ये नामांकने आमंत्रित करण्यात आली आहेत.
अपंगत्व असलेल्या व्यक्ती: या वर्गातील पुरस्कार अपंगत्व असलेल्या अशा व्यक्तींसाठी देण्यात येत आहेत, ज्यांनी अॅक्सेसिबिलिटी आणि युनिव्हर्सल डिझाइनच्या क्षेत्रात प्रभाव टाकला आहे. या क्षेत्रात केलेले काम हे धोरण नेटवर्क, पायाभूत पातळीवरील अंमलबजावणी, डिझाइन आणि विकास, साध्यता ऑडिट्स किंवा हक्कांची चळवळ/ पुरस्कार अशा क्षेत्रांमध्ये असू शकते. दरवर्षी देशभरातील तीन व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
कामकाजी व्यावसायिक: ते शैक्षणिक संस्था/ स्वयंसेवी संस्था/ कॉर्पोरेट संघटना/ शासकीय संस्थेचे कर्मचारी असू शकतात, ज्यांनी हे कार्य केलेले असू शकते फ्रीलान्सर ज्यांनी आपला वेळ या कार्यासाठी समर्पित केलेला आहे. या क्षेत्राप्रति त्यांचे वैयक्तिक योगदान संस्था/ कंपनी/ चळवळीने प्राप्त केलेल्या यशाचे मुख्य कारण असले पाहिजे. त्या अशाही व्यक्ती असू शकतात ज्या कोणत्याही संस्थात्मक आधारापासून स्वतंत्र कामात सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांनी अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी साध्यता मिळवण्याचा हेतू साध्य करण्यात यश प्राप्त केले आहे. दरवर्षी या क्षेत्रातील पुरस्कार देशभरातील ३व्यक्तींना दिले जातात.
कंपन्या / संघटना: या वर्गातील पुरस्कार अशा कंपन्या आणि व्यक्तींना दिले जातात, ज्यांनी वरील कोणत्याही विभागात अॅक्सेसिबिलिटी आणि युनिव्हर्सल डिझाइनचे कार्य हाती घेतले आहे. अशा कंपन्या/ संस्था ज्यांनी अपंगत्व असलेल्या व्यक्तींना नेमले आहे किंवा त्यांच्या सेवा घेतल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या क्षमतांनुसार सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी समान संधी दिली आहे. या कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक संस्था/ स्वयंसेवी संस्था/ कॉर्पोरेट संस्था/ सरकारी आस्थापना/ खासगी क्षेत्र/ सार्वजनिक क्षेत्र/ संयुक्त क्षेत्र/ एसएमई/ प्रोप्रायटरशिप/ भागीदारी संस्था असू शकतात. दरवर्षी या वर्गातील पुरस्कार देशभरातील चार कंपन्या/ संस्थांना दिले जातात.
एनसीपीईडीपी- एम्फसिस जावेद अबिदी पब्लिक पॉलिसी अवॉर्ड फॉर युनिव्हर्सल डिझाइन: या वर्गातील पुरस्कारांची सुरूवात २०१८ साली दिवंगत श्री. जावेद अबिदी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ करण्यात आली होती. अॅक्सेसिबिलिटी आणि युनव्हर्सल डिझाइनच्या तत्वांना चालना देण्यासाठी हा पुरस्कार सुरू करण्यात आला. अपंगत्व असलेल्या व्यक्तींना भारतातील इतर नागरिकांप्रमाणेच समान संधी आणि हक्क देण्यासाठी एक समान वातावरणाच्या निर्मितीच्या दृष्टीने प्रत्यक्ष सुविधा, वाहतूक, आयसीटी, उत्पादने आणि सेवा देण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती/ संस्थांसाठी दोन पुरस्कार दिले जातील.