दैनिक स्थैर्य । दि.२० जानेवारी २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या व भारतीय जनता पार्टीच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडत खंडाळा नगरपंचायतीवर आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणा-या राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अनिरुध्द गाढवे यांना जोरदार धक्कातंञ देत 10 जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले.विशेष म्हणजे खंडाळा नगरपंचायत निवडणूकीमध्ये काँग्रेसला व शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही.
खंडाळा नगरपंचायतीच्या निवडणूकीत चुरशीने मतदान झाले होते .यावेळी विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
खंडाळा नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी मोठी चुरस निर्माण झाली होती . पंचवार्षिक सत्तेच्या आखाडयात ५१ उमेदवारांनी उडी घेतली होती . अटीतटीच्या या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागांवर विजय मिळवून पुन्हा एकदा सत्ता काबीज केली तर भाजपाला ७ जागांवर समाधान मानावे लागले.
गतवेळीही खंडाळयात राष्ट्रवादीने विजय मिळवला होता मात्र काटावरच्या बहुमतामुळे आणि पक्षांतर्गत कुरघोडीमुळे पाच वर्षात सत्ता समीकरणात अनेक फेरबदल झाले मात्र पुन्हा त्याची पुनरावृत्ती नको या ध्येयाने राष्ट्रवादीने एकसंघ निवडणूक लढविली त्यामुळे केलेल्या कामाचे रूपांतर विजयात झाले.
वास्तविक गतवेळेचा अनुभव लक्षात घेऊन आमदार मकरंद पाटील यांनी खंडाळयात विशेष लक्ष घातले होते तर खंडाळा तालुका सह.साखर कारखाना निवडणूकीपासून बोध घेतलेल्या भारतीय जनता पार्टीने एकसंघ लढाई देण्याचा प्रयत्न केला परंतू अपयश आले. एकूणच मकरंद आबांची किमया यामुळे पुन्हा एकदा दिसून आली .
खंडाळा नगरपंचायतीसाठी मिळालेली मते पुढील प्रमाणे – प्रभाग १ मध्ये पुष्पा खंडागळे १०५ (राष्ट्रवादी ) , छाया दुधाणे २७ ( भाजपा ) , प्रभाग २ मध्ये राहुल गाढवे ११३ ( भाजपा ) , शैलेश गाढवे ११५ ( राष्ट्रवादी ) , गोविंद गाढवे ०६ ( शिवसेना ) ,प्रभाग ३ मध्ये सुधीर सोनावणे १२५ ( राष्ट्रवादी ) , प्रल्हाद खंडागळे ९४ ( भाजपा ) ,प्रभाग ४ मध्ये योगेश गाढवे ११७ ( भाजपा ) , अमोल गाढवे ० ( शिवसेना ) , महेंद्र गाढवे ११४ ( राष्ट्रवादी ) , प्रभाग ५ मध्ये संतोष देशमुख २ ( अपक्ष ) , दत्तात्रय गाढवे ६० ( भाजपा ), संदीप गाढवे १३२ ( राष्ट्रवादी ) , प्रभाग ६ मध्ये पल्लवी गाढवे ८७ ( राष्ट्रवादी ), सविता गाढवे १४१ ( भाजपा ) , प्रभाग ७ मध्ये संदीप जाधव १०९ ( भाजपा ) , सत्यवान जाधव ७८ ( काँग्रेस ) , अक्षय गायकवाड १३ ( अपक्ष ) , हर्षद गायकवाड ९५ ( राष्ट्रवादी ) , दत्तात्रय खंडागळे १ ( अपक्ष ) , प्रभाग ८ मध्ये नंदा गायकवाड १६३ ( राष्ट्रवादी ) , वनिता संकपाळ ६४ ( भाजपा ), विजया संकपाळ ७ ( अपक्ष ), प्रभाग ९ मध्ये संध्या काळभोर १३ ( शिवसेना ), निर्मला पवार ११९ ( राष्ट्रवादी ) , मनिषा यादव १५७ ( भाजपा ) , प्रभाग १० मध्ये चंद्रकांत पवार २१७ ( भाजपा ) , सागर गुरव १६३ ( राष्ट्रवादी ) , प्रभाग ११ मध्ये मोनिका मोरे १२८ ( राष्ट्रवादी ), मोनाली गायकवाड १३ ( अपक्ष ), गौरी घाडगे ६ ( अपक्ष ), स्वाती खंडागळे ७० ( भाजपा ) , अनुराधा गायकवाड ६४ ( काँग्रेस ) , ज्योती कांबळे १३ ( अपक्ष ), प्रभाग १२ मध्ये रेखा गाढवे २४२ ( भाजपा ), रूपाली गाढवे ११७ ( राष्ट्रवादी ) , प्रभाग १३ मध्ये हेमलता ठोंबरे १२७ ( राष्ट्रवादी ) , वनिता शिर्के १०० ( भाजपा ), प्रभाग १४ मध्ये हणमंत पवार ८७ ( राष्ट्रवादी ), फिरोज पटवेकरी १११ ( भाजपा ) , शिरीषकुमार गाढवे २९ ( रासप) , प्रभाग १५ मध्ये शितल खंडागळे १४४ ( राष्ट्रवादी ), उज्वला खंडागळे १०१ ( भाजपा ), प्रियांका मुळीक १९ ( कॉंग्रेस ) , प्रभाग १६ मध्ये प्रमोद शिंदे ५ ( शिवसेना ) , योगेश संकपाळ १६८ ( राष्ट्रवादी ) , पांडुरंग खरात १२१ ( भाजपा ) , रत्नकांत भोसले ७ ( काँग्रेस ) , प्रभाग १७ मध्ये उज्वला संकपाळ १६६ ( राष्ट्रवादी ), सुलोचना संकपाळ १०८ ( भाजपा ) , अश्विनी शिंदे ९ ( शिवसेना )
राष्ट्रवादी विजयी उमेदवार – पुष्पा खंडागळे , शैलेश (आबा) गाढवे , सुधीर सोनावणे, संदीप गाढवे , नंदा गायकवाड , मोनिका मोरे , हेमलता ठोंबरे , शितल खंडागळे , योगेश संकपाळ , उज्वला संकपाळ
भाजपाचे विजयी उमेदवार – योगेश गाढवे , सविता गाढवे , संदीप जाधव , मनिषा यादव , चंद्रकांत पवार , रेखा गाढवे , फिरोज पटवेकरी.