
दैनिक स्थैर्य | दि. 24 मार्च 2025 | फलटण | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सभासद नोंदणी मोहिमेची सुरवात फलटण येथील डी. एड. कॉलेज चौक येथे राज्यसभा खासदार नितीन (काका) पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी मतदारसंघात उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या कार्याचा प्रभाव असल्याने या विधानसभा मतदारसंघातून १० हजार सभासद करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.
उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राज्यामध्ये आता संघटनामत्क बांधणी करण्याचे कामकाज सुरु आहे. यामध्ये फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सुद्धा श्रीमंत शिवरूपराजे यांच्या नेतृत्वात आपण मागे राहणार नाही. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची फलटण कार्यकारणी सुद्धा सर्वसमावेशक बांधण्याचे कामकाज आम्ही करणार आहोत, असे मत सुद्धा आमदार सचिन पाटील यांनी व्यक्त केले.
आमदार सचिन पाटील व तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या नेतृत्वात फलटण शहराध्यक्ष म्हणून युवा नेते राहुल निंबाळकर, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष म्हणून रणजित भुजबळ, विराज सोनवलकर यांची तालुका सरचिटणीस पदी तर फलटण तालुका राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी निवृत्ती खताळ यांची निवड करण्यात आली आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फलटण शहरातून गौरव नष्टे यांनी सुद्धा राजे गटाला राम राम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे, त्यांची शहर युवक उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा राज्यसभा खासदार नितीन (काका) पाटील, फलटण – कोरेगाव मतदार संघाचे आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फलटण तालुका अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, महानंदाचे माजी व्हाईस चेअरमन डि. के. पवार, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे यांच्यासह विविध मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.