दैनिक स्थैर्य । दि. 11 ऑक्टोबर 2021 । फलटण । राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व मुधोजी महाविद्यालयाने समाजाची गरज ओळखून आयोजित केलेले रक्तदान शिबिर व विद्यार्थ्यांचे कोवीड लसीकरण कौतुकास्पद आहे, असे मत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपक चव्हाण साहेब यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस फलटण तालुका, शहर व मुधोजी महाविद्यालय फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने मुधोजी महाविद्यालय फलटण येथे रक्तदान शिबिर व विद्यार्थ्यांचे कोवीड लसीकरण आयोजित केलेले होते. शिबीराचे उद्घाटन आमदार दिपक चव्हाण यांचे हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. रक्तदान शिबिरासाठी 57 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 57 रक्तदाते पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला होता तो ही यावेळी पूर्ण झाला.
यावेळी फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी’चे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य डॉ. प्राश्वनाथ राजवैद्य, माळजाई उद्यान समितीचे चेअरमन प्रतापसिंह निंबाळकर, यश कन्स्ट्रक्शनचे राजीव नाईक निंबाळकर, युवा ग्रामपंचायत सदस्य शुभम नलवडे, ओंकार कदम, रूपेश नेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर शिबीरादरम्यान मुधोजी महाविद्यालय’चे प्राचार्य डॉ.पी एच कदम, उपप्राचार्य प्रा.ठोंबरे, प्रा.सुधीर इंगळे, एन सी सी विभाग प्रमुख प्रा.धुमाळ, एन एस एस विभाग प्रमुख प्रा.पाडवी, प्रा.पी.आर पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर कदम, जिल्हा सरचिटणीस आदित्य भोईटे, तालुकाध्यक्ष अभिजीत निंबाळकर, तालुका उपाध्यक्ष निलेश जठार, निरंजन पिसाळ, तालुका सरचिटणीस सचिन काकडे, तालुका संघटक प्रसाद जाधव, प्रथमेश शेलार, प्रताप नाळे, स्वप्निल पिसाळ, शहराध्यक्ष आकाश सोनवलकर, शहर उपाध्यक्ष प्रफुल्ल अहिवळे, शहर संघटक ओम पवार या पदाधिकार्यांनी रक्तदान शिबिर व विद्यार्थ्यांचे कोवीड लसीकरण उत्स्फूर्त रित्या पार पाडले.
रक्तदान शिबिरासाठी फलटण ब्लड बॅकेचे डॉ.बिपीन शहा तसेच विद्यार्थ्यांचे कोवीड लसीकरणासाठी नागरी आरोग्य केंद्र फलटणच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनवलकर व कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाबद्दल संयोजकांचे महाराष्ट्र विधानपरिषद सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक व युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्क अॅण्ड मिल्क प्रोडक्ट्सचे संचालक व युवा नेते श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समिती सदस्य व युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी कौतुक केले.